CIBIL Score: काय असतो Credit Score आणि कसा करायचा चेक?

तुम्ही तुमच्या नवीन घरासाठी किंवा गाडीसाठी बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत आहात का? जर होय, तर तुम्हाला तुमच्या बँकेला तुमचा Credit Score दाखावा लागतो आणि तो चांगला असेल तरच तुम्हाला बँक तुम्हाला कर्ज देऊ शकते. या स्कोअरला Credit Score किंवा CIBIL Score असे म्हणतात. बँकेकडून कोणत्याही प्रकारचे Loan घेण्यासाठी किंवा Credit Card घेण्यासाठी CIBIL Score बंधनकारक आहे.

CIBIL Score स्कोअरच्या आधारे बँक तुमचे कर्ज मंजूर करत असते. त्यामुळे, क्रेडिट स्कोअरबद्दल माहिती असणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला CIBIL Score बद्दल जास्त माहिती नसेल तर काळजी करू नका, आज आपण या लेखात सिबिल स्कोअर बद्दल माहिती घेणार आहोत त्यामुळे हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

CIBIL Score म्हणजे काय? (CIBIL Score in Marathi)

CIBIL चा फुल फॉर्म Credit Information Bureau of India Limited असा आहे. सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर ही 300 आणि 900 मधील तीन अंकी संख्या असते जिच्याद्वारे तुमची क्रेडिट योग्यता दर्शवते. CIBIL Score तुमच्या आर्थिक व्यवहारांवर आधारित असतो, जसे की कर्ज घेणे, क्रेडिट कार्ड वापरणे आणि वेळेवर पैसे भरणे. CIBIL Score ची कर्ज मिळवण्यात महत्त्वाची भूमिका असते. 750 किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवणे महत्त्वाचे असते.

CIBIL Score द्वारे बँका बघतात की तुम्ही यापूर्वी किती कर्ज घेतले आहे किंवा तुम्ही क्रेडिट कार्ड कसे वापरले इत्यादी. क्रेडिट स्कोअर हा परतफेडीचा इतिहास, क्रेडिट युटिलायझेशन रेशो आणि सध्याचे कर्ज पेमेंट इत्यादींद्वारे निर्धारित केला जातो. जेवढा जास्त CIBIL Score तेवढी कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते आणि कमी व्याज दराने कर्ज मिळू शकते, क्रेडिट कार्ड मिळविणे हि सोपे होते.

Cibil Score कसा मोजला जातो? (How to Calculate CIBIL Score)

Cibil Score मोजण्यासाठी म्हणजे आपला क्रेडिट स्कोअर काढण्यासाठी खालील 5 घटकांचा विचार केला जातो. खालील घटकांच्या आधारे Cibil Score ची गणना केली जाते.

1) Payment History (30%) – आपल्या खात्यावरील पेमेंटचा इतिहास हा Cibil Score चा एक महत्वाचा घटक आहे. वेळेवर केलेलं पेमेंट चांगले असतात तर जर पेमेंट उशिरा केले तर त्यामुळे Cibil Score कमी होतो.

2) Credit Utilization Ratio (25%) – आपल्याकडील असलेली क्रेडिट कार्डची मर्यादा आणि आपण त्यातील किती रक्कम वापरतो याला Credit Utilization Ratio असे म्हणतात. याचा Cibil वरती परिणाम होतो.

3) Credit Type and Duration (25%) – आपल्यावर असलेले Credit कोणत्या प्रकारचे आहे आणि कधीपासून आहे हे सुद्धा महत्वाचे आहे. जेवढा आपला क्रेडिट इतिहास जुना असेल तेवढे चांगले असते. त्यामुळे Credit खाते लवकर बनवायला पाहिजे.

4) Other (20%) – यामधे येते New Credit म्हणजे तुम्ही नुकतेच कोणते क्रेडिट किंवा लोन घेतलेले आहे का. याचा परिणाम सुद्धा Cibil वरती होतो आणि कोणत्या प्रकारे क्रेडिट किंवा लोन आहे याचा सुद्धा परिणाम होतो.

CIBIL Score का महत्त्वाचा असतो? (Importance of CIBIL Score)

सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर ही 300 आणि 900 मधील तीन अंकी संख्या असते जिच्याद्वारे तुमची क्रेडिट योग्यता दर्शवते. CIBIL Score अनेक कारणांमुळे महत्त्वाचा आहे, त्यातील काही खालीलप्रमाणे –

1) कर्ज मिळण्यासाठी

आपल्याला बँकेद्वारे कर्ज मिळेल की नाही हे तुमच्या CIBIL स्कोरवरती अवलंबून असते. आपला CIBIL स्कोअर जेवढा जास्त असेल, तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. जर कोणाचा CIBIL स्कोर कमी असेल तर त्या व्यक्तीला कर्ज मिळणे कठीण होऊ शकते.

2) व्याज दर

तुम्हाला कर्जावर मिळणारा व्याज दर सुद्धा तुमच्या CIBIL स्कोरवर अवलंबून असतो. तुमचा CIBIL स्कोर जितका जास्त असेल, तितका कमी व्याज दर मिळू शकतो. कमी CIBIL स्कोर असलेल्या व्यक्तीला जास्त व्याज दर द्यावा लागू शकतो.

3) क्रेडिट कार्ड

आपल्याला मिळणारे क्रेडिट कार्ड हे आपल्या CIBIL स्कोरवर अवलंबून असते. तुमचा CIBIL स्कोर जितका जास्त असेल, तुम्हाला चांगल्या सुविधा असलेले क्रेडिट कार्ड मिळू शकते. कमी CIBIL स्कोअर असलेल्या व्यक्तीला कमी क्रेडिट मर्यादा आणि उच्च व्याज दर असलेले क्रेडिट कार्ड मिळते.

4) विमा प्रीमियम

तुमच्या विमा प्रीमियमवर तुमच्या सिबिल स्कोअरचा परिणाम होऊ शकतो. चांगल्या सिबिल स्कोअरमुळे तुम्हाला कमी विमा प्रीमियम मिळू शकते. अश्या अनेक फायद्यांसाठी Cibil Score कमी असणे महत्वाचे असते.

वरील कारणांसाठी Cibil Score महत्वाचा असतो. Cibil Score हा 300 ते 900 श्रेणीत असतो, तर आता आपण या श्रेणी बद्दल माहिती घेऊयात.

CIBIL Score श्रेणी कशी वाचायची? (CIBIL Score Range)

सिबिल स्कोअर हा 300 ते 900 पर्यंतच्या श्रेणीत असतो. तुमचा सिबिल स्कोअर तुम्हाला तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये मिळेल. तुम्ही सिबिल वेबसाइटवरून किंवा बँकेद्वारे तुमचा क्रेडिट रिपोर्ट मिळवू शकता. क्रेडिट रिपोर्ट कसा मिळवायचा याबद्दल मी खाली सांगितलेले आहे.

सिबिल स्कोअर खालीलप्रमाणे वाचला जातो:

  • 300-599: हा स्कोअर खराब मानला जातो आणि तुम्हाला कर्ज मिळण्यास अडचण येऊ शकते.
  • 600-699: हा स्कोअर मध्यम मानला जातो आणि तुम्हाला कर्ज मिळू शकते, परंतु तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागू शकते.
  • 700-799: हा स्कोअर चांगला मानला जातो आणि तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता वाढते आणि तुम्हाला कमी व्याज द्यावे लागू शकते.
  • 800-900: हा स्कोअर उत्तम मानला जातो आणि तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते आणि तुम्हाला सर्वात कमी व्याज द्यावे लागू शकते.

CIBIL Score कसा चेक करावा? (How to Check CIBIL Score)

सिबिल स्कोर चेक करण्यासाठी अनेक पद्धती उपलब्ध आहेत. तुम्ही CIBIL च्या वेबसाइटवरून तुम्ही तुमचा Credit Report आणि CIBIL Score विनामूल्य मिळवू शकता. यासाठी, तुम्हाला तुमचा PAN कार्ड क्रमांक आणि जन्मतारीख द्यावी लागेल. CIBIL च्या वेबसाईट द्वारे CIBIL Score चेक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा –

1. सिबिलच्या अधिकारीक वेबसाइट यावर जा आणि “Get Your Free CIBIL Report” बटणवर क्लिक करा.

2. आता तुमचे पूर्ण नाव, जन्म तारीख, पिन कोड आणि ईमेल पत्ता हे सर्व दिलेल्या जागेत भरा.

3. आपल्या ओळखपत्राचा पुरावा (पासपोर्ट नंबर, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड) अपलोड करा.

4. तुमच्या फोनवर आलेला OTP टाइप करा आणि प्रक्रिया पुढे चालू ठेवा.

5. आता येथे तुमचा सिबिल स्कोअर आणि रिपोर्ट स्क्रीनवर दिसेल.

Cibil Score सुधारण्यासाठी काही टिप्स (Improve CIBIL Score)

आपला Cibil Score म्हणजेच Credit Score हा आपल्या क्रेडिटच्या इतिहासावर आधारित असतो. जर तुमचे सर्व पेमेंट वेळेवर असतील तर क्रेडिट स्कोअर चांगला असतो, ज्यामुळे तुम्हाला कर्ज मिळवायला सोपे जाते आणि जर हा स्कोअर कमी असेल तर कर्ज मिळवण्यास कठीण असते. त्यामुळे तुम्ही क्रेडिट स्कोअर नेहमी चांगला ठेवावा, त्यासाठी मी खाली काही टिप्स दिल्या आहेत –

  • Credit Card चा आणि कर्जाचा हप्ता वेळेवर भरत जा यामुळे सिबिल स्कोअर सुधारण्यास मदत होते.
  • Credit Card ची मर्यादा कमी ठेवा म्हणजे जितका खर्च कमी कराल तेवढे कर्ज कमी भरावे लागेल.
  • कर्ज घेण्यासाठी वारंवार अर्ज करू नका यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो, त्यामुळे अर्ज करण्याआधी विचारपूर्वक निर्णय घ्या.
  • क्रेडिट स्कोअर नेहमी तपासत राहा, म्हणजे क्रेडिट रिपोर्ट मध्ये काही चुका असतील तर तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता.

क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी अजून काही मार्ग आहेत, त्यासाठी तुम्ही बँकेत किंवा वित्तीय सल्लागाराला विचारू शकता.

निष्कर्ष

आपला क्रेडिट स्कोअर हा आपल्या आर्थिक आरोग्याचा महत्त्वाचा पैलू आहे. चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळे आपल्याला कर्ज आणि क्रेडिट कार्ड सहज मिळू शकतात, आणि ते पण कमी व्याजदरात. आपण आपला क्रेडिट स्कोअर नियमितपणे तपासून त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मला आशा आहे कि आपल्याला वरील पोस्ट व्यवस्थितपणे समजली असेल.

आजच्या CIBIL Score म्हणजे काय? (CIBIL Score in Marathi) पोस्ट संबंधित जर आपल्याला काही शंका असतील तर आपण कमेंट करून विचारू शकता आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत किंवा सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका. शेअर मार्केट, इंटरनेट, तंत्रज्ञान अश्या विषयावर माहितीसाठी या ब्लॉगवर पुन्हा पुन्हा येत राहा. धन्यवाद!

Leave a Comment