एलएलबी (LLB) कोर्स ची संपूर्ण माहिती (LLB Course Information in Marathi)

बारावी झाल्यावर कशाला ऍडमिशन घ्यावे हा प्रश्न अनेकांच्या मनात चालू असतो. बारावी नंतर विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग, फार्मसी, BSC, ई असे अनेक डिग्री कोर्स आहेत. प्रत्येकजण आपल्या आवडीच्या कोर्स ला ऍडमिशन घेत असतो. आपल्यापैकी अनेक जणांची इच्छा असते की वकील बनावे परंतु यासाठी ऍडमिशन कसे घ्यावे व एलएलबी साठी काय पात्रता आहे हे अनेकांना माहीत नसते.

आजच्या लेखमध्ये आपण LLB Course Information जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला LLB Admission घ्यायचे असेल तर ही माहिती आपण नक्कीच वाचायला हवी. LLB Course करून आपण वकील बनू शकता, वकिलांचा आपल्या देशात खूप आदर केला जातो. ज्या विद्यार्थ्यांना कायदा-कानून मध्ये करियर करायचे आहे, ते LLB Course करून वकील बनवू शकता व आपले भविष्य उज्वल बनवू शकता.

एलएलबी (LLB) कोर्स ची संपूर्ण माहिती (LLB Course Information in Marathi)

LLB Course बद्दल महत्त्वाची माहीती, आपण या लेखामध्ये पाहुत. LLB साठी ऍडमिशन घेण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकाला ही माहिती उपयोगाची पडेल. तर चला जास्त वेळ न लावता सुरू करूयात.

एलएलबी म्हणजे काय?

एलएलबी (Bachelor of Laws) ही एक Under Graduate डिग्री आहे जी नियम आणि कायद्याचे परिपूर्ण शिक्षण देते. आपला देश ज्या नियम व कायद्यावर चालतो त्याचे पूर्ण शिक्षण एलएलबी मध्ये शिकवले जाते. एलएलबी कोर्स करून वकील बनता येते. LLB Course विद्यार्थ्याला वकील बनणे व कोणत्याही कायद्याच्या विभागात कार्य करण्यास योग्य बनवते.

एलएलबी डिग्री ची सुरुवात इंग्लंड मध्ये झाली होती, व त्यानंतर जपान मध्ये ही प्रचलित झाली. सुरुवातीला ही डिग्री फक्त आर्टस् चे विद्यार्थी करत असत पण आता कोणत्याही शाखेतील विद्यार्थी ही डिग्री करण्यास इच्छुक असतात. एलएलबी झाल्यावर विद्यार्थी त्याच्या कुवतीनुसार नोकरी मिळवू शकतो किंवा पुढील शिक्षण करू शकतो. महाराष्ट्रात ही पदवी खूप लोकप्रिय आहे, दरवर्षी हजारो विद्यार्थी यासाठी प्रवेश घेतात.

एलएलबी चा फुल फॉर्म

LLB चा फुल फॉर्म “Legum Baccalaureus” असा होतो जो एक लॅटिन भाषेतील शब्द आहे. साधारण भाषेत LLB ला Bachelor of Laws असे म्हणतात. LLB ला BL (Bachelor of Laws) असेही म्हणतात. LLB ही Law क्षेत्रातील एक Under Graduate डिग्री आहे.

एलएलबी पात्रता

एलएलबी साठी पात्रता काय आहे हे आपल्याला माहीत असावे. तर चला आता आपण Eligibility for LLB पाहुयात.

  • १) एलएलबी करण्यासाठी उमेदवार बारावी बोर्ड परीक्षेत पास झालेला असावा. उमेदवार बोर्ड परीक्षेत किमान ४५% गुणाने उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
  • २) एलएलबी साठी ची Entrance Exam उमेदवाराने दिलेली असावी. महाराष्ट्रात एलएलबी प्रवेश साठी MHT-CET Entrance Exam घेतली जाते.
  • ३) बारावी नंतर LLB करणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ वर्षाची LLB असते व जर डिग्री नंतर केली तर 3 वर्षाची असते.
  • ४) डिग्री नंतर LLB करण्यासाठी मान्यताप्राप्त महाविद्यालयातुन ४५% मार्क्स असणे आवश्यक आहे.
  • ५) भारतात एलएलबी करण्यासाठी वयाची कोणतीही उच्च मर्यादा नाही.

एलएलबी प्रवेश प्रक्रिया

एलएलबी ला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार द्वारे आयोजित MHT-CET Exam द्यावी लागते. या Exam ला Law CET असे म्हणतात. Law CET Exam ही 150 मार्क्स ची असते. Law CET Exam मध्ये सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात व दोन तासाचा हा पेपर असतो. या परीक्षेचे मार्क्स ग्राह्य धरून Law कॉलेज मध्ये मेरिट लावले जाते व यानुसार प्रवेश दिला जातो.

एलएलबी कोर्स कालावधी

एलएलबी कोर्स दोन प्रकारचा असतो, पहिला 3 वर्षाचा व दुसरा 5 वर्षाचा. डिग्री पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना LLB Course 3 वर्षाचा असतो. LLB ला प्रवेश घेण्यासाठी त्यांना Law CET Exam द्यावी लागते व त्या CET च्या मार्क्स नुसार प्रवेश दिला जातो.

बारावी नंतर LLB करायची असेल तर त्यासाठी 5 वर्षाचा कालावधी लागतो. बारावी साठीही Law CET Exam घेतली जाते व त्यानुसार LLB चे ऍडमिशन केले जाते. बारावी नंतर एलएलबी केल्यावर Graduation Degree पण मिळते व LLB ची डिग्री सुद्धा मिळते. याला इंटिग्रेटेड LLB असे म्हणतात.

एलएलबी नंतर नोकरीचे प्रमुख पर्याय

एलएलबी नंतर अनेक क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त विद्यार्थी पुढे पण शिकू शकतो. एलएलबी नंतर विद्यार्थी खालील नोकऱ्या करू शकतो.

  • १) एलएलबी झालेला विद्यार्थी वकील म्हणून नोकरी करू शकतो.
  • २) सरकारी वकील बनण्याची संधीही उपलब्ध आहे.
  • ३) एलएलबी झालेला विद्यार्थी खाजगी किंवा सरकारी संस्था, बँका, कायदेशीर विभाग, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कायदेशीर सल्लागार बनू शकतो.
  • ४) यासोबतच कॉलेज मध्ये व्याख्याता म्हणूनही नोकरी करू शकतो.

निष्कर्ष

आता आपल्याला LLB Course Information सोबतच अजून बरीच महत्वाची माहिती मिळाली असेल व आपल्याला संपूर्ण माहिती समजली असेल अशी मी आशा करतो. LLB Course मध्ये आवड असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही माहिती उपयोगी आहे.

LLB साठी इच्छुक असलेल्या आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. ज्यामुळे त्यांना पण ही बेसिक माहिती मिळेल. लेखामध्ये काहीही अपूर्णता असेल किंवा तुम्हाला काहीही अडचण असेल तर कंमेंट करून नक्की विचारा. अश्याच प्रकारच्या विविध माहितीसाठी मराठी ऑनलाईन या ब्लॉगला Subscribe नक्की करा.

Leave a Comment