BBA Course Information in Marathi: बारावी झाल्यानंतर Graduation करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे अनेक पर्याय असतात. यावेळेस सर्व विद्यार्थी गोंधळात असतात की आपण काय करावे?, कोणत्या कोर्स ला ऍडमिशन घ्यावे? या परिस्थितीत सर्वजण आपल्या आवडत्या कोर्स विषयी माहिती गोळा करण्यास सुरू करतात. कोणतीही गोस्ट करण्याआधी त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते, त्यामुळे पुढे काहीही अडचण येत नाही.
नोकरी न करता स्वतः चा व्यवसाय करावा असे अनेकांना वाटते. खूप जणांचा नोकरीत कमी आणि बिजनेसमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. अश्या विद्यार्थ्यांसाठी BBA Course हा एक उत्तम पर्याय आहे. Business क्षेत्रात करियर करण्यासाठी BBA Course हा एक उत्तम पर्याय आहे. या पोस्टमध्ये BBA कोर्स बद्दल संपूर्ण माहिती BBA Course Information in Marathi दिलेली आहे.
बीबीए (BBA) कोर्स ची संपूर्ण माहिती (BBA Course Information in Marathi)
आजच्या या पोस्टमध्ये आपण बीबीए या कोर्स बद्दल माहिती BBA Course Information in Marathi घेणार आहोत. हा बारावी नंतरचा एक लोकप्रिय Bachelor डिग्री कोर्स आहे, त्यामुळे आपण याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आज आपण पाहुत की BBA कोर्स काय आहे, BBA Full Form, BBA कसे करावे आणि यासाठी पात्रता काय आहे, अशी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता मुख्य महितीकडे वळूयात.
बीबीए (BBA) म्हणजे काय आहे? (What is BBA in Marathi)
बीबीए (BBA) चे पूर्ण रूप “Bachelor of Business Administration” असा होतो. BBA ही बारावी Class 12th नंतर करता येणारी एक पदवी आहे. BBA कोर्समध्ये बिजनेस संबंधित शिक्षण दिले जाते. हा कोर्स 3 वर्षाचा असतो, यात विद्यार्थ्यांना बिजनेस संबंधित बेसिकपासून ऍडव्हान्स पर्यंत संपूर्ण ज्ञान दिले जाते. BBA कोर्स मध्ये आपल्याला Business Management संबंधित सर्व गोष्टी शिकवल्या जातात.
BBA Course Information in Marathi
BBA कोर्स केल्यावर आपण स्वतः चा व्यवसाय सुरू करू शकतो किंवा आपण चांगल्या नोकरीसाठी सुद्धा प्रयत्न करू शकता. BBA कोर्स Full-Time किंवा Correspondence Mode मध्ये करता येतो. BBA कोर्स केल्यावर पुढे MBA करता येते, PGDM, MMS सारखे पदव्या तुम्ही BBA नंतर घेऊ शकता. यामध्ये डिग्री घेतल्यावर मार्केटिंग, शिक्षण, फायनान्स, सेल्स, सरकारी नोकरी, ई हे करियर पर्याय आपल्यासाठी खुले होतात.
बीबीए (BBA) चा फुल फॉर्म मराठी (BBA Full Form in Marathi)
BBA चा फुल फॉर्म “Bachelor of Business Administration” असा होतो. याला मराठीत “बॅचलर ऑफ बिझनेस अडमिनिस्ट्रेशन” असे म्हणतात.
B – Bachelor of
B – Business
A – Administration
बीबीए (BBA) साठी पात्रता (Eligibility for BBA Course)
आपल्याला BBA कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर खालील पात्रता अटी पूर्ण असल्या पाहिजेत. BBA कोर्स करण्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे –
- BBA कोर्स करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळ किंवा विद्यापीठातून बारावी उत्तीर्ण असावा.
- उमेदवारांनी इयत्ता 12 मध्ये किमान 50% आणि त्याहून अधिक गुण मिळवलेले असावेत.
- जर एखादा उमेदवार बारावीच्या परीक्षेला बसला असेल आणि निकालाची वाट पाहत असेल, तर तो सुद्धा BBA कोर्ससाठी अर्ज करू शकतो.
बीबीए (BBA) प्रवेश परीक्षा (BBA Entrance Exams)
BBA च्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या लोकप्रिय प्रवेश परीक्षा खालीलप्रमाणे –
- SET (Symbiosis Entrance Test)
- IPU CET (Indraprastha University Common Entrance Test)
- NPAT (National Test for Programs After Twelfth)
- UGAT (Under Graduate Aptitude Test)
- IPMAT (Integrated Program in Management Aptitude Test)
बीबीए (BBA) ची फी (BBA Course Fees in Marathi)
बीबीए (BBA) करण्यासाठी किती फी लागते?, हा प्रश्न आपल्या मनात आला असेल. तर बीबीए (BBA) तुम्ही सरकारी किंवा खाजगी कॉलेज मधून करू शकता. आपण कोणत्या कॉलेज मधून बीबीए (BBA) करता त्यानुसार फीमध्ये फरक असतो.
खाजगी (Private) कॉलेज मध्ये बीबीए (BBA) साठी 1 लाख ते 2.5 लाख पर्यंत फी असते आणि सरकारी (Government) कॉलेज मध्ये खाजगी कॉलेजपेक्षा कमी फी असते. यामुळे सर्व विद्यार्थी सरकारी कॉलेज मध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतात.
बीबीए (BBA) करण्याचे फायदे (Benefits of BBA Course)
बीबीए (BBA) मध्ये Graduation करण्याचे फायदे खालीलप्रमाणे –
- व्यवसाय आणि व्यवस्थापनात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीबीए ही पूर्णपणे व्यावसायिक पदवी आहे.
- बीबीए कोर्स तुम्हाला व्यवसाय आणि उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्यात मदत करतो. बीबीए कोर्स केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी व्यवस्थापनाबद्दल बरेच काही शिकायला मिळते.
- ज्या विद्यार्थ्यांना एमबीए करायचे आहे त्यांच्यासाठी बीबीए करणे फायदेशीर आहे. बीबीए नंतर एमबीए केले तर तुम्हाला चांगली सॅलरी मिळण्याची शक्यता असते.
- बीबीए पदवी केवळ व्यवसायाशी संबंधित शिक्षण मिळवण्यासाठीच नाही तर व्यक्तिमत्त्व विकासाबाबतही शिकता येते.
- BBA केल्यानंतर तुम्ही सरकारी क्षेत्रात आणि आयटी मध्येही नोकरी करू शकता.
- BBA ही पदवी तुम्हाला एक मजबूत, आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती बनण्यास मदत करते जे टीम सांभाळण्यात म्हणजेच पूर्ण कंपनी चालवण्यात सुद्धा सक्षम असतात.
बीबीए (BBA) मध्ये नोकरीच्या संधी (Jobs After BBA)
बीबीए (BBA) केल्यावर अनेक नोकऱ्या आहेत. आपण अनेक क्षेत्रात नोकरी करू शकता. ते खालीलप्रमाणे –
- Finance Sector
- Management Sector
- Marketing
- Real Estate Business
- Sales Executive
- Advertising
- Aviation
- Consultancy
निष्कर्ष –
आता आपल्याला BBA Course Information in Marathi सोबतच अजून बरीच महत्वाची माहिती मिळाली असेल व आपल्याला संपूर्ण माहिती समजली असेल अशी मी आशा करतो. BBA Course मध्ये आवड असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही माहिती उपयोगी आहे.
BBA साठी इच्छुक असलेल्या आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. ज्यामुळे त्यांना पण ही बेसिक माहिती मिळेल. लेखामध्ये काहीही अपूर्णता असेल किंवा तुम्हाला काहीही अडचण असेल तर कंमेंट करून नक्की विचारा. अश्याच प्रकारच्या विविध माहितीसाठी मराठी ऑनलाईन या ब्लॉगला पुन्हा भेट द्या.