संगणक म्हणजे काय – व्याख्या, इतिहास, प्रकार आणि फायदे व तोटे

Computer Information in Marathi: आजच्या काळात संगणक हा मानवाच्या जीवनातील एक महत्वाचा घटक बनला आहे. शाळा, कॉलेज असो किंवा ऑफिस कार्यालय, सर्वत्र संगणक वापरात आहे. सर्वजण संगणकाच्या मदतीने स्मार्ट झाले आहेत. संगणकाने काम सोपे कसे करायचे हे सर्वाना समजलेले आहे. संगणक (Computer) हे एक असे उपकरण आहे जे दिलेल्या सूचनांनुसार डेटा वर प्रक्रिया करते आणि युजरला आउटपुट प्रदान करते.

आपली दैनंदिन कामे जसे, इमेल पाठवणे, गेम खेळणे, कागदपत्रे टाईप करणे, ई साठी बऱ्याच लोकांकडे घरी संगणक आहे. संगणक प्रत्येकाकडे असायलाच हवे कारण, संगणक आता काळाची गरज बनले आहे. मोठमोठे गणिते काही सेकंदात सोडवणे, कामांची नोंद ठेवणे, किंवा मनोरंजनाचे साधन म्हणून संगणक वापरले जातेय. या पोस्टमध्ये आपण संगणक ची माहिती मराठी मध्ये पाहणार आहोत, त्यामुळे संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

संगणकाची संपूर्ण माहिती मराठी Computer Information in Marathi

आजकाल सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या संगणकाची Information असणे हे सामान्य ज्ञानासाठी गरजेचे आहे, यासाठी या पोस्टमध्ये मी संगणक म्हणजे काय, संपूर्ण बेसिक माहिती देत आहे. यामध्ये तुम्हाला संगणकासंबंधित असलेल्या सर्व मूलभूत प्रश्नांची उत्तरे मिळतील.

विविध स्पर्धा परीक्षांसाठी किंवा सामान्य ज्ञान म्हणून या माहितीची गरज असते. हे लक्षात घेऊन मी शक्य तितकी माहिती संग्रहित करून येथे दिलेली आहे. आपण आजच्या या पोस्टमध्ये संगणकाचा इतिहास, संगणकाचे प्रकार, कार्यप्रणाली, संगणकाचे भाग, व संगणकाचे फायदे आणि तोटे हे सर्व मुद्दे एकत्रित केलेले आहेत. 

संगणक म्हणजे काय?

संगणक हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती (Data) विश्लेषण, माहिती प्रक्रिया (Processing), सांख्यिकी आकडेमोड करणारे एक उपकरण आहे.

संगणकावर कोणतेही काम करण्यासाठी संगणकाला सूचना (Instructions) द्याव्या लागतात. दिलेल्या सुचनांनुसार संगणक डेटावर प्रक्रिया करून डेटा आउटपुट च्या स्वरूपात परत करते. संगणकामध्ये डेटाला साठवण्याची, परत करण्याची वर डेटावर प्रक्रिया करण्याची क्षमता असते. संगणक एका वेळेस हजारों प्रक्रिया करण्यास सक्षम असते. संगणकाला इंग्रजी भाषेत Computer असे म्हटले जाते. Computer हा शब्द Compute या शब्दापासून बनला आहे. Compute चा मराठी अर्थ गणना करणे असा होतो. पूर्वीच्या काळी संगणकाचा वापर फक्त गणना करण्यापर्यंतच मर्यादित होता त्यामुळे Computer हे नाव दिले गेले.

सुरुवातीच्या काळातील संगणक विकसीत नव्हते, त्यांचा उपयोग गणितीय क्रिया करण्यापर्यंत मर्यादित होता. कालांतराने जसे जसे तंत्रज्ञान वाढत गेले त्यानुसार संगणकात प्रचंड प्रमाणात बदल होत गेले आणि संगणक आधुनिक झाले. संगणकाला एका प्रकारे प्रोग्रॅमेबल मशीन म्हणले जाते. आताच्या आधुनिक संगणकामध्ये प्रत्येक कार्यासाठी प्रोग्राम लिहून ठेवलेले असतात आणि त्यानुसार संगणक कार्य करते. संगणकाचा विकास अजूनही सुरू आहे. संगणकाला अजून आधुनिक बनवण्यासाठी काम चालू आहे. नवीन नवीन सुविधा संगणकात जोडण्यावर भर दिला जात आहे.

COMPUTER शब्दाचे पूर्ण रूप

संगणकाचा वापर असंख्य क्षेत्रात केला जातोय, त्यामुळे Computer या शब्दाचा एक निर्धारित Full Form असणे शक्य नाही. तरीही मी लोकप्रियता आणि अर्थाला मिळून एक Full Form खाली देत आहे.

  • C – Commonly
  • O – Operating
  • M – Machine
  • P – Particularly
  • U – Used In
  • T – Technology
  • E – Education and
  • R – Research     

मराठी भाषांतर केले तर….एक सामान्य ऑपरेटिंग मशीन जी विशेषतः तंत्रज्ञान, शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात वापरली जाते.

इतिहास

संगणकाचा शोध २००० वर्षापूर्वी (अंदाजे) लागला होता असे वैज्ञानिक सांगत आहेत.  

Abacus हे जगातील पहिले संगणक आहे. हे लाकडाचे बनवलेले संगणक होते. गणितीय क्रिया करण्यासाठी याचा वापर केला जायचा. हे संगणक १७ व्या शतकापर्यंत फक्त गणना करण्यासाठी वापरले गेले. 17 व्या शतकापासून Computing Devices विकसित केली गेली आणि तेव्हापासून, तांत्रिक प्रगतीमुळे अत्याधुनिक आधुनिक संगणकांचा विकास झाला.

19 व्या शतकात, गणितज्ञ चार्ल्स बॅबेज यांनी Analytical Engine चा निर्माण केला, हे पहिले यांत्रिक संगणक होते. मात्र, निधीअभावी ते कधीही बांधले गेले नाही. नंतर, 20 व्या शतकात, Konrad Zuse, John Atanasoff, and John Mauchly सारख्या प्रवर्तकांनी आधुनिक संगणकीय उद्योगासाठी पाया घालणारे पहिले इलेक्ट्रॉनिक संगणक विकसित केले.

संगणकाचा विकास पिढ्या नुसार होत गेला त्याप्रमाणे संगणकाच्या इतिहासाला History पाच पिढ्यात विभागले आहे. प्रत्येक पिढीनुसार संगणकाचा आकार लहान होत गेला आणि संगणक आधुनिक बनत गेले.

संगणकाच्या पाच पिढ्या –

  • १) पहिली पिढी – (१९४० – १९५६) “Vacuum Tubes”
  • २) दुसरी पिढी – (१९५६ – १९६३) “Transistors”
  • ३) तिसरी पिढी – (१९६३ – १९७१) “Integrated Circuits”
  • ४) चौथी पिढी – (१९७१ – १९८०) “Microprocessor”
  • ५) पाचवी पिढी – (१९८० – वर्तमान) “Artificial Intelligence”

संगणकाच्या इतिहासाबद्दल अधिक माहितीसाठी आमची हि पोस्ट वाचू शकता – जाणून घ्या संगणकाचा संपूर्ण इतिहास

संगणकाचा शोध कोणी लावला? 

संगणकाचा शोध लावण्याचे क्षेय कोणा एका व्यक्तीला देता येणार नाही. यात अनेक शास्त्रज्ञांचे योगदान आहे. संगणकाच्या शोधात महत्वाचे योगदान देणाऱ्या चार्ल्स बॅबेज यांना “संगणकाचे जनक” म्हटले जाते. यांनी जगातील सर्वात पहिले Analytical इंजिन १८३७ मध्ये बनवले होते.

चार्ल्स बॅबेज यांनी बनवलेल्या इंजिनमध्ये बेसिक फ्लो कंट्रोल आणि Integrated Memory चा सिद्धांत वापरला होता, आणि आजही याच सिद्धांत वर संगणक बनवले जातात. याच कारणामुळे चार्ल्स बॅबेज यांचे योगदान सर्वात मोलाचे मानले जाते.

कार्यप्रणाली

    संगणकाची मुख्य कार्यप्रणालीची चार भागात विभागणी केली जाते. यूजर कडून सूचना घेणे, सूचनेनुसार प्रक्रिया करणे आणि सूचनेनुसार प्रक्रिया केलेला डेटा यूजर ला आउटपुट च्या स्वरूपात परत करणे आणि डेटा पुन्हा वापरण्यासाठी साठून ठेवणे. या सर्व क्रियांना अनुक्रमे इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट आणि स्टोरेज असे म्हणतात.

१) इनपुट- यूजर कडून संगणकाला दिल्या जाणाऱ्या सूचनेला किंवा आदेशाला इनपुट असे म्हणतात. असे समजा की तुम्हाला Paint हे सॉफ्टवेअर ओपन करायचे आहे. आपण सर्वात पहिले सर्च बॉक्स मध्ये paint टाइप करतो आणि enter करतो, म्हणजे संगणकाला पेंट सॉफ्टवेअर ओपन करायचा आदेश मिळतो. 

२) प्रोसेसिंग – संगणकाला दिलेल्या इनपुट नुसार प्रक्रिया करणे म्हणजे प्रोसेसिंग. Paint Enter केल्यावर संगणक प्रक्रिया करते म्हणजे संगणक स्वतः च्या मेमरी मध्ये paint हे सॉफ्टवेअर शोधते आणि ते आपल्यासमोर उगढून देते. 

३) आउटपुट- प्रोसेसिंग प्रक्रिया झाल्यानंतर सर्व डेटा CPU द्वारे आउटपुट डिव्हाइस मध्ये पाठवला जातो. आपण उघडलेले पेंट सॉफ्टवेअर आपल्याला स्क्रीन वर दर्शवले जाते म्हणजे स्क्रीन हे एक आउटपुट डिव्हाइस आहे.

४) स्टोरेज- वरील जी सर्व प्रक्रिया होत असते, त्यासाठी मेमरीची गरज असते. जर आउटपुट द्वारे मिळवलेला डेटा जर पुन्हा वापरायचा असल्यास तो मेमरी मध्ये साठवून ठेवला जातो.

भाग

    मानवाच्या शरीराप्रमाणे संगणकाचे सुद्धा भाग असतात. प्रत्येक भागाचे ठराविक कार्य असतात जेणेकरून संगणक सुरळीतरित्या कार्य करते. संगणकाचे काही भाग डोळ्यांनी दिसणारे असतात म्हणजे आपण त्यांना स्पर्श करू शकतो, अशा भागांना संगणक हार्डवेअर असे म्हणतात. उदा… मॉनिटर, कीबोर्ड, माउस, ई.

    प्रोग्रॅम्स, सॉफ्टवेअर, ई ह्या भागांना आपण स्पर्श करू शकत नाहीत आणि हे दिसत पण नसतात त्यांना संगणक सॉफ्टवेअर असे म्हणतात. हार्डवेअर संगणकाचे शरीर असते तर सॉफ्टवेअर संगणकाचे मन असते. तर चला येथे आपण संगणकाच्या काही महत्त्वाच्या भागाची माहिती घेऊयात.

१) मदरबोर्ड –

    संगणकाचे सर्व हार्डवेअर पार्टस जसे, माउस, कीबोर्ड, मॉनिटर, प्रिंटर यांना एकमेकांशी जोडण्यासाठी मदरबोर्ड वापरले जाते. मॉनिटरच्या बाजूला एक आयताकृती बॉक्स ठेवलेला असतो त्यात हे मदरबोर्ड असते.

    मदरबोर्डला संगणकाचे Main Circuit Board म्हटले जाते. मदरबोर्ड द्वारे CPU, RAM, Hard Drive, Graphics कार्ड हे संगणकाला जोडता येतात.

२) CPU –

    CPU (Central Processing Unit) ला संगणकाचा मेंदू म्हटले जाते. त्याप्रमाणे मानवाचा मेंदू सर्व अवयवांना नियंत्रित करतो, त्याप्रमाणे संगणकाच्या सर्व भागांना CPU आदेश देतो आणि त्यानुसार सर्व भाग कार्य करतात.

     यूजर ने दिलेल्या आदेशानुसार CPU प्रक्रिया करते आणि यूजरला आउटपुट प्रदान करते आणि हे आउटपुट मॉनिटर स्क्रीनद्वारे दर्शवले जाते. मदरबोर्डच्या CPU सॉकेटमध्ये CPU जोडलेले असते. 

३) RAM –

     RAM म्हणजे संगणकाची तात्पुरती मेमरी असते. CPU जेंव्हा प्रक्रिया करत असते तेंव्हा तो डेटा तात्पुरत्या स्वरूपात RAM मध्ये साठवून ठेवला जातो.

RAM मध्ये डेटा कायमस्वरूपी साठवता येत नाही, म्हणजे संगणक बंद केल्यावर डेटा आपोआप हटवला जातो.

४) स्टोरेज डिवाइस

    संगणकामध्ये डेटा साठवून ठेवण्यासाठी दोन प्रकारचे स्टोरेज डिवाइस वापरले जातात.

१) Hard Disk Drive (HDD)

२) Solid State Drive (SSD) 

     संगणकात असलेले फाईल, विडिओ, ऑडिओ, PDF सॉफ्टवेअर, ई हे सर्व स्टोरेज डिव्हाइस मध्ये साठवले जातात. डेटाला कायमस्वरूपी साठवण्यासाठी स्टोरेज डिव्हाइस वापरले जातात. 

५) इनपुट-आउटपुट डिवाइस –

     इनपुट- आउटपुट डिव्हाइस म्हणजे जे डिव्हाइस संगणकाला इनपुट देतात आणि आउटपुट यूजरला दर्शवतात. या डिव्हाइसमुळे संगणक आणि यूजरमध्ये संवाद शक्य होतो.

इनपुट- आउटपुट डिव्हाइसची नावे-

प्रकार

     संगणक म्हणजे मॉनिटर, त्याशेजारी ठेवलेले कॅबिनेट, माउस, कीबोर्ड, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहेत. संगणक म्हणजे कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिवाइस जे यूजरने दिलेल्या आदेशानुसार आउटपुट प्रदान करते. यात कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिवाइस येते. आपण खाली काही इलेक्ट्रॉनिक डिवाइस ची माहिती घेऊयात.

१) डेस्कटॉप संगणक –

    डेस्कटॉप कॉम्पुटर हे टेबल वर ठेवले जाणारे संगणक आहे. मॉनिटर, माउस, कीबोर्ड हे डेस्कटॉप संगणकाचे पार्ट आहेत.

Desktop कॉम्पुटर चालवण्यासाठी माउस व कीबोर्डचा वापर केला जातो आणि आउटपुट आपल्याला मॉनिटर स्क्रीन वर दर्शवले जाते. डेस्कटॉप संगणक मुख्य Power Supply वर चालते, यात बॅटरी नसते.

२) लॅपटॉप –

     Laptop Computer जवळपास Desktop Computer सारखेच असते. डेस्कटॉप कॉम्पुटर प्रमाणे लॅपटॉप ला माउस व कीबोर्ड ची गरज नसते. कीबोर्ड आणि टच पॅड In-Built दिलेले असतात.

डेस्कटॉप च्या तुलनेत लॅपटॉप लहान व हलके असतात. लॅपटॉप बॅटरी वर चालतात. एकदा चार्जिंग केल्यावर काही तासासाठी हे वापरता येतात.

३) टॅबलेट –

    टॅबलेट हे लॅपटॉप पेक्षा छोटे आणि स्मार्टफोन पेक्षा मोठे असतात. टॅबलेट मध्ये टच स्क्रीन दिलेली असते. यात टच पॅड ला इनपुट देण्यासाठी बोटाने टच करावे लागते किंवा Stylus चा वापर केला जातो.

लॅपटॉप प्रमाणे टॅबलेट बॅटरीवर चालतात. टॅबलेट चा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे सहजपणे कोठेही नेता येतात.

४) सर्व्हर –

     सर्व्हर हे एक प्रकारचे संगणक आहे. याचा वापर संगणकांना इंटरनेट द्वारे माहिती, संसाधन आणि सेवा सुविधा, ई प्रदान करण्यासाठी केला जातो.

याचे विविध प्रकार असतात. जसे वेब सर्व्हर, मेल सर्व्हर, फाईल सर्व्हर, एप्लिकेशन सर्व्हर.

संगणकाच्या प्रकारांबद्दल विस्तारित माहितीसाठी पुढील पोस्ट वाचा – संगणकाचे प्रकार व त्यांची माहिती

फायदे व तोटे

संगणक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. वैयक्तिक वापरापासून व्यावसायिक वापरापर्यंत, त्यांनी आमचे जीवन अधिक सोपे आणि सोयीस्कर बनवले आहे. तथापि, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात एक चांगली आणि एक वाईट तसे कॉम्पुटर चे सुद्धा आहे. तर चला कॉम्पुटर चे फायदे आणि तोटे पाहुयात.

फायदे –

  • १) संगणकामुळे कोणत्याही विषयावर माहिती क्षणात उपलब्ध होते.
  • २) मानवाला अशक्य असलेली कामे करण्याची क्षमता संगणकात असते.
  • ३) संगणकामुळे वेळेची बचत होते.
  • ४) संगणक पूर्णरावृत्ती कार्यांना स्वयंचलित करते.
  • ५) मनोरंजनाचे साधन म्हणून संगणकाचा वापर केला जातो.

तोटे –

  • १)  संगणकाचा वापर कंपन्या व कारखान्यात होऊ लागल्याने बेरोजगारी वाढत चालली आहे.
  • २) संगणकाचा जास्त वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे.
  • ३) संगणकामुळे ऑनलाईन व्यवहारातील फसवणूक वाढली आहे.
  • ४) संगणकीय वायरस व हॅकिंगमुळे सुरक्षितता धोक्यात अडकली आहे.
  • ५) संगणकाचे खराब झालेले पार्टसची विल्हेवाट न लावता आल्याने पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो.

संगणकाचे फायदे आणि तोटे जाणून घेण्यासाठी पुढील पोस्ट वाचा – संगणकाचे फायदे व तोटे, संपूर्ण माहिती

निष्कर्ष

आजच्या पोस्टमध्ये संगणकाची संपूर्ण माहिती मराठीत Computer Information In Marathi, मी तुम्हाला दिलेली आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला सर्व माहिती चांगल्याप्रकारे समजली असेल.

Computer Information In Marathi या पोस्ट संबंधित काहीही अडचण असेल तर कंमेंट द्वारे विचारायला विसरू नका आणि या विषयावर अधिक माहितीसाठी Maha Guide या ब्लॉगला वारंवार भेट देत राहा.

आपणास संगणक म्हणजे काय, संपूर्ण बेसिक माहिती Computer Information in Marathi  हा लेख कसा वाटला, मला कंमेंट द्वारे नक्की कळवा.

Leave a Comment