Mouse Information in Marathi: आज आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनीच डेस्कटॉप संगणक वापरले असेल किंवा पाहिले तरी असेल. Desktop Computer चा वापर सर्वत्र होत आहे, त्यामुळे Desktop Computer पाहणे म्हणजे काही मोठी गोष्ट राहिलेली नाही.
डेस्कटॉप संगणकाला बरेच हार्डवेअर इनपुट आणि आउटपुट उपकरणे जोडलेली असतात, त्यांना आपण संगणकाचे भाग असे म्हणतो. त्यात Mouse हे एक हार्डवेअर इनपुट उपकरण आहे.
आपण ज्याप्रमाणे कोणत्याही वस्तूला उचलताना, कोठे हलवताना, वापरताना हाताचा वापर करतो, त्याप्रमाणे डेस्कटॉप संगणक मधील सॉफ्टवेअर, Apps, फोल्डर्स, फाईल्स, ई यांना Copy, Paste, Move करण्यासाठी माऊस वापरले जाते.
माऊस ची माहिती मराठी Mouse Information in Marathi
कॉम्पुटर माऊस हे सर्वांनाच माहीत आहे, पण याचे प्रकार, इतिहास, माऊस चे पार्ट, उपयोग याबद्दल आपल्याला बरीचशी माहिती नसेल, त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आपण कॉम्पुटर माऊस ची माहिती मराठी घेणार आहोत.
माऊस म्हणजे काय?
माऊस हे डेस्कटॉप संगणकाचे हार्डवेअर उपकरण आहे. हे Graphical User Interface च्या आधारावर कार्य करणारे इनपुट डिवाईस आहे. संगणकाला इनपुट देणाऱ्या Pointing Devices पैकी माऊस आहे. माऊस चा उपयोग मुख्यतः डेस्कटॉप स्क्रीन वरील घटक निवडणे, उघडणे, बंद करणे, हटवणे, ई साठी केला जातो. माऊस वापरून यूजर कॉम्पुटर स्क्रीनवर कोठेही जाऊ शकतो.
माऊस चा उपयोग करून संगणकाला इनपुट देणे शक्य होते, जेणेकरून Files, Folders, Applications, Softwares, ई ना आपण Cut, Copy, Paste, Delete करता येते. कॉम्पुटर च्या स्क्रीनवर एक तिरका बाण असतो त्याला कर्सर किंवा Pointer म्हणतात. या कर्सर चे नियंत्रण माऊस द्वारे केले जाते.
माऊस एका सपाट पृष्ठभागावर ठेवला जातो. माऊस जसा पृष्ठभागावर सरकवला जातो तसे स्क्रीन वरील कर्सर सरकते. या सपाट पृष्ठभागाला माऊस पॅड म्हटले जाते. माऊस ला संगणकाशी Connect करण्यासाठी वायर वापरली जाते, किंवा Bluetooth द्वारे कनेक्ट केले जाते.
माऊस ला सामान्यतः दोन बटण असतात-
- १) Right-Click
- 2) Left-Click
आणि या दोन्ही बटण च्या मध्ये एक Scroll Wheel असते. यांचा एकत्रित वापर करून माऊस द्वारे कॉम्पुटर चालवले जाते.
माऊस चा इतिहास
कॉम्पुटर माऊस चे पहिले नाव X-Y Position Indicator असे आहे, कारण माऊस हा यूजर ला पोझिशन दाखवत असतो. माऊस चा वापर Display System मध्ये केला जातो. माऊस च्या History नुसार इ. स. 1960 मध्ये डग्लस एंगेलबार्ट (Douglas Engelbart) यांनी जगातल्या प्रथम माऊस चा निर्माण केला. डग्लस एंगेलबार्ट यांनी या शोधामुळे 17 नोव्हेंबर 1970 या दिवशी पेटंट घेतले.
डग्लस एंगेलबार्ट माऊस चा निर्माण करत असताना कॅलिफोर्निया मधील स्टॅन्डफोर्ड रिसर्च इन्स्टिटयूट मध्ये काम करत होते. माऊसचा पहिला वापर Xerox Alto कॉम्पुटर सिस्टिम मध्ये साली केला गेला, पण याला चांगले यश मिळाले नाही. त्यानंतर पुढे Apple Lisa कॉम्पुटर मध्ये माऊस वापरले गेले. आजच्या काळात सर्व डेस्कटॉप संगणकात Pointing Device म्हणून माऊस वापरले जातेय.
माऊस चे उपयोग
आजच्या काळात सर्वांनाच कॉम्पुटर माऊस ची ओळख आहे. पण माऊस वापरताना तुमच्या मनात नक्की प्रश्न आला असेल की माऊस चे Uses नेमके कोणते आहेत. तर चला खाली मी माऊस चे काही महत्त्वाचे कार्ये दिली आहेत.
1) Movement of Mouse Cursor – माऊस कर्सर ची हालचाल करणे हे माऊस चे प्राथमिक कार्य आहे. आपण जसे माऊस पॅड वर माऊस सरकवतो, तसे स्क्रीन वर असलेला कर्सर सरकतो. माऊस कर्सर च्या मदतीने डेस्कटॉप स्क्रीनवर कोठेही जाणे शक्य होते. माऊस ची सर्व कामे कर्सर च्या मदतीनेच शक्य होतात, त्यामुळे कर्सर हा माऊस चा सर्वात मुख्य घटक आहे.
2) Selection – माऊस चा वापर करून यूजर कोणतेही Images, Text, Files आणि Folders, सिलेक्ट करू शकतो. व त्यांच्या वर काही क्रिया जसे Cut, Copy, Paste करू शकतो. आपण कोणताही घटक सिलेक्ट केल्यावर त्याच्या बाजूला एक निळ्या रंगाचा बॉक्स तयार होतो. आणि पुढे आपण माऊस चे Right Click बटन चा वापर करून हवी ती क्रिया करू शकतो.
3) Drag- Drop – संगणकाच्या स्क्रीन वरील कोणतेही घटक आपण माऊस च्या मदतीने कोठेही नेऊ शकतो, या प्रक्रियेला Drag- Drop असे म्हणतात. ते घटक Software, Applications, Files, Folders, Images आणि Videos यापैकी कोणतेही असू शकतात. Drag- Drop प्रक्रियेत प्रथम ते Object सिलेक्ट करावे लागते आणि हव्या त्या ठिकाणी नेऊन सोडायचे असते. कोणताही घटक सिलेक्ट केल्यावर Left Click बटन दाबून धरावे लागते आणि हव्या त्या ठिकाणी नेऊन सोडावे लागते.
4) Scrolling – आपल्याला जर मोठ्या वेबसाईट किंवा Document वर काम करायचे असेल तर आपल्याला माऊस च्या Scroll बटन ची गरज लागते. माऊस मध्ये दोन्ही क्लिक बटन च्या मध्ये एक उभी फिरकी असते, तिला Scroll बटन असे म्हणतात. जसे ते Scroll बटन आपण बोटाने फिरवतो, त्यानुसार स्क्रीन वरील Document खाली-वर सरकते. या बटन चा उपयोग नुसता Document साठी नाही तर, Powerpoint, Word, Exel येथे मोठ्या Files बनवताना किंवा वाचताना होतो.
5) Hovering – माऊस कर्सर जेव्हा Clickable घटक जसे Link वर नेला जातो, त्यावेळेस आपल्याला त्याची माहिती दिसते. या क्रियेला Hovering असे म्हणतात. जर Clickable घटक लिंक असेल तर आपल्याला लिंक चा रंग बदललेला पाहायला मिळेल किंवा लिंक कोणती आहे हि क्लिक न करता सुद्धा समजते.
माऊस चे पोर्ट्स
माऊस ला संगणकाशी Connect करण्यासाठी काही विशिष्ट Technology वापरली जाते. माऊस ला संगणकाशी Connect केल्याने आपण माऊस द्वारे संगणकापर्यंत Input देऊ शकतो. खाली काही माऊस मध्ये वापरल्या जाणाऱ्या Connection Ports ची नावे दिलेली आहेत-
- Bluetooth
- Infrared
- PS/2 Port
- Serial Port
- USB
माउस चे प्रकार
माऊस हा संगणकाचा एक अति महत्वाचा भाग आहे. आज बाजारात अनेक प्रकारचे माऊस उपलब्ध आहेत. माऊस च्या प्रकारानुसार त्याच्या वैशिष्ट्यात वेगळे पण असते. यूजर आपल्या आवश्यकते नुसार माऊस चा प्रकार निवडतो. आम्ही खाली काही Types of Mouse ची नावे दिलेली आहेत.
- मेकॅनिकल माऊस
- ऑप्टिकल माऊस
- कॉर्डलेस माऊस
- ट्रेस बॉल
- स्टायलस
- J- माऊस
- लेजर माऊस
- टच पॅड
माऊस चे भाग
माऊस च्या प्रकारानुसार माऊस च्या पार्टस मधेही वेगळेपणा असू शकतो. आम्ही खाली माऊस चे सामान्य पार्टस ची माहिती दिली आहे.
1 ) Buttons – आजच्या काळात सर्वात जास्त वापरला जाणाऱ्या माऊस ला दोन बटण असतात. एक बटण डाव्या बाजूला आणि एक बटण उजव्या बाजूला असते. याचा वापर करून कॉम्पुटर मधील Text आणि Objects वर प्रक्रिया करणे शक्य होते. जुन्या माऊस ला एकच बटण असायचे. उदा… Apple कंपनी च्या माऊस ला एकच बटण असते.
2) Ball/ Laser/ LED – बॉल, लेजर आणि LED यांचा वापर माऊस कर्सर ला X- Y Direction मध्ये Move करण्यासाठी केला जातो. बॉल चा वापर मेकॅनिकल माऊस मध्ये केला जातो, तर लेजर आणि LED चा वापर ऑप्टिकल माऊस मध्ये केला जातो. माऊस च्या खालच्या भागात ही उपकरणे जोडलेली असतात.
3) Scroll Wheel – माऊस च्या दोन बटण च्या मध्ये एक उभ्या चकासारखे उपकरण असते त्याला Scroll Wheel असे म्हणतात. Scroll Wheel च्या मदतीने आपण मोठ्या आकाराच्या Documents किंवा वेबसाईट पेजेस ला वर किंवा खाली स्क्रोल करू शकतो.
4) Cable किंवा Receiver – Wired म्हणजेच Corded माऊस मध्ये केबल चा वापर Transmitting Device म्हणून केलेला असतो. Cable ला कॉम्पुटरशी कनेक्ट करण्यासाठी USB किंवा PS/2 पोर्ट वापरले जाते. Wireless माऊस मध्ये Wireless Receivers जोडलेले असतात. जसे, Bluetooth, USB Wireless Receiver, ई.
5) Circuit Board – माऊस च्या आत मध्ये हे Circuit Board बसवलेले असते. या Circuit Board ला Capacitor, Diode आणि Register ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जोडलेले असतात. यूजर जेंव्हा माऊस चे बटण दाबतो, त्यावेळी तो Input Signal हा Circuit Board ला इलेक्ट्रॉनिक सिग्नल च्या स्वरूपात मिळतो आणि पुढे हा सिग्नल संगणकाला Cable किंवा Wireless Receiver द्वारे पाठवला जातो.
निष्कर्ष
संगणक माऊस ची संपूर्ण माहिती, आता मी तुम्हाला दिलेली आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला सर्व माहिती चांगल्याप्रकारे समजली असेल. आपणास जर काही अडचण असेल तर कंमेंट द्वारे विचारायला विसरू नका आणि या विषयावर अधिक माहितीसाठी ब्लॉगला वारंवार भेट देत राहा.
आपल्याला अजून कोणत्याही विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपणास आजचा माऊस म्हणजे काय, संपूर्ण माहिती Mouse Information in Marathi हा लेख कसा वाटला, मला कंमेंट द्वारे नक्की कळवा.