Data Information in Marathi: डेटा किंवा डाटा (Data) हा शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा ऐकत असतो. आजच्या इंटरनेटच्या जमान्यात हा शब्द खूप लोकप्रिय झाला आहे. संगणक आणि अँड्रॉइड मोबाईल फोनवर त्याचा वापर खूप होतो. आपण डेटा हा शब्द अनेकदा वापरला असेल परंतु तरीही डेटा म्हणजे नक्की काय आहे हे माहित नाही, आणि त्यामुळेच आपण येथे आला आहात.
डेटा हा शब्द आपण बर्याच वेळा वापरतो, त्यामुळे आपल्याला डेटाबद्दल माहिती असायला हवी. तुम्हालाही डेटा म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
डेटा (Data) ची माहिती मराठी Data Information in Marathi
या लेखाद्वारे, तुम्हाला डेटा म्हणजे काय, डेटाचे प्रकार कोणते आहेत, डेटा कसा Store करायचा, डेटा कसा मोजतात आणि बरीच माहिती मिळेल. तुम्हाला या लेखात या प्रकारची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार आहे जी तुमच्यासाठी नेहमीच उपयोगी ठरेल.
डेटा (Data) म्हणजे काय?
डेटा हा शब्द तथ्ये, संकल्पना, सूचना इत्यादींचे योग्य स्वरूपात प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरला जातो, जे आपण वाचू शकतो, संवाद साधू शकतो, अर्थ लावू शकतो आणि आवश्यकतेनुसार प्रक्रिया करू शकतो. डेटा हे Datum या शब्दाचे अनेकवचन आहे ज्याचा अर्थ “दिलेला” असा आहे. एखाद्या गोष्टीबद्दलच्या माहिती ला ‘डेटा’ असे म्हणतात थोडक्यात डेटा म्हणजे माहिती असे म्हणू शकता. या माहितीमध्ये संख्या, शब्द, चित्रे, चिन्हे, मते इ. विविध स्त्रोतांकडून डेटा गोळा केला जातो.
डेटा वरती विविध माध्यमांद्वारे प्रक्रिया करून नवीन डेटा बनवला जातो. संगणक हे इलेक्ट्रॉनिक मशीन असल्याने संगणकाद्वारे डेटावर प्रक्रिया करण्याच्या प्रक्रियेला EDP म्हणजेच Electronic Data Processing म्हणतात. संगणकासाठी डेटा हे Numbers असतात जो Bytes चा एक ग्रुप असतो. Computer Data ला Binary अंकात (0 आणि 1) मध्ये दर्शविले जाते. प्रक्रिया करण्यासाठी हा डेटा CPU कडे जातो आणि त्यावर प्रक्रिया करून नवीन डेटा बनवला जातो.
Data आणि Information मध्ये काय फरक आहे?
आपण डेटाला Information चा प्रकार असे म्हणू शकतो. उदाहरणार्थ – डेटामध्ये एक प्रकारची माहिती संग्रहित केली जाते, जी Value चा संग्रह असते. डेटा हा कोणत्याही प्रकारचा असू शकतो, त्यात Numbers, Characters, Alphabet , Symbols काहीही असू शकते. तर Information हा एक प्रकारचा refined data असते.
Information हा एक प्रकारचा डेटाच असते, परंतु ती अशा प्रकारे process केलेली असती कि कोणताही मनुष्य सहजपणे वाचू शकतो. आपण असे म्हणू शकतो की संगणक डेटावर प्रक्रिया करतो आणि Information मध्ये रूपांतरित करतो.
डेटा चे प्रकार काय आहेत?
डेटा हा विविध स्वरूपात असतो, त्यामुळे जेंव्हा त्याचा वापर कॉम्प्युटरमध्ये होतो त्यावेळी त्याचे काही प्रकार पडतात. ते खालीलप्रमाणे –
- संख्यात्मक डेटा (Numerical Data)
- अक्षरात्मक डेटा (Alphabetic Data)
- चिन्हात्मक डेटा (Alpha Numeric Data)
- ध्वनी डेटा (Sound Data)
- व्हिडिओ डेटा (Video Data)
- ग्राफिकल डेटा (Graphical Data)
१) संख्यात्मक डेटा
संख्यात्मक डेटा म्हणजे असा डेटा जो संख्यांच्या रूपात असतो. हा डेटा 0 ते 9 या संख्यांपासून बनलेला असतो. या डेटा वर आपण गणितीय क्रिया करू शकतो.
उदा.. वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या
२) अक्षरात्मक डेटा
अक्षरात्मक डेटा म्हणजे अक्षरांपासून बनलेला डेटा. इंग्रजी वर्णमाला (A ते Z) किंवा मराठी वर्णमाला (क… ज्ञ) पासून बनलेल्या डेटा ला अक्षरात्मक डेटा असे म्हणतात.
उदा.. वर्गातील विद्यार्थ्यांची नावे
३) चिन्हात्मक डेटा
चिन्हात्मक डेटा हा चिन्हांच्या रूपात असतो. यावर गणितीय क्रिया करता येत नाही परंतु याची तुलना करता येते. हा डेटा @, #, &, असे चिन्ह वापरून बनलेला असतो.
४) ध्वनी डेटा
ध्वनी डेटा हा आवाजाच्या स्वरूपात असतो, ऑडियो फाईल मध्ये ध्वनी डेटा save केलेला असतो. यामधे कोणताही साऊंड save करून ठेवता येतो. गाणे आणि ऑडियो रेकॉर्डिंग हा ध्वनी डेटा आहे.
५) व्हिडिओ डेटा
व्हिडिओ डेटा हा चलचित्र च्या स्वरूपात असतो, म्हणजे व्हिडिओ असतो. Movies, किंवा व्हिडिओ क्लिप्स हे video डेटा मधे येतात.
६) ग्राफिकल डेटा
या अंतर्गत येणारा डेटा ग्राफिकल स्वरूपात असतो. आपण फोन मधे फोटो म्हणजे image सेव करतो तो एक प्रकारचा ग्राफिकल डेटा आहे.
डेटा कसा दर्शविला जातो?
डेटा represent करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. डेटा दर्शवणे म्हणजे याचे दृश्य स्वरूप तयार करणे जेणेकरून ते मानवाला सहजपणे समजता येईल आणि विश्लेषण करता येईल. डेटा दर्शवण्याचे अनेक प्रकार आहेत, परंतु काही सामान्य प्रकारांमध्ये Bar Graph, Pie Chart, Line Graph आणि Frequency table यांचा समावेश आहे.
१) Bar Graph
Bar Graph मध्ये डेटाला उभ्या किंवा आडव्या बारमध्ये दर्शवले जाते. जसे वरती फोटोमध्ये दर्शवले आहे. बारचा आकार डेटा च्या value शी संबंधित असतो. उदा… एखाद्या कंपनीचे वर्षात किती sell झाले याचा डेटा आपण Bar Graph मध्ये दाखवू शकतो. Bar Graph वापरून आपण वेगवेगळ्या महिन्यांत विक्रीचे तुलनात्मक मूल्यांकन करू शकतो.
२) Pie Chart
Pie Chart हा डेटाला केकच्या तुकड्यांमध्ये दर्शवितो. केकच्या प्रत्येक तुकड्याचा आकार डेटाच्या value शी संबंधित असतो. उदा.. एखाद्या कंपनीच्या ग्राहक आधाराचा सांख्यिकीय विश्लेषण सादर करण्यासाठी, आपण Pie Chart वापरू शकतो जेणेकरून आपण ग्राहकांच्या वयोगट आणि लिंगाचे वितरण पाहू शकतो.
३) Line Graph
Line Graph डेटाला वेळेच्या फरकानुसार सादर करतो. रेषेचा उतार डेटाच्या value शी संबंधित असतो. उदा.. एखाद्या देशातील लोकसंख्येच्या वाढीचा इतिहास सादर करण्यासाठी, आपण रेखांकन वापरू शकतो.
४) Frequency Table
Frequency Table (वारंवारता सारणी) डेटा मूल्यांच्या वारंवारतेचे सादर करते. सारणीमध्ये प्रत्येक डेटा मूल्य आणि त्याचे वारंवारताचा समावेश असतो. उदा.. एखाद्या शाळेत विद्यार्थ्यांच्या वयोगटाचे वितरण सादर करण्यासाठी, आपण वारंवारता सारणी वापरू शकतो.
डेटा दर्शवण्यासाठी अजूनही खूप मार्ग आहेत. त्यांचा वापर करून डेटा ला दृश्यमान बनवले जाते जेणेकरून मानव डेटा ला समजू शकेल. तर चला आता डेटा स्टोर म्हणजे संग्रहित कसा केला जातो हे जाणून घेऊयात.
डेटा स्टोर कसा केला जातो?
जेव्हा आपल्याकडे महत्वाचा डेटा असतो, तेव्हा तो सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला तो संग्रहित करावा लागतो. डेटा संग्रहित करण्यासाठी, स्टोरेज आवश्यक आहे. डेटा संग्रहित केल्यावर आपण तो आवश्यकतेनुसार कधीही वापरू शकतो. भौतिक जगात, डेटा कागदावर लिहिला जातो आणि फाइलमध्ये संग्रहित केला जातो. परंतु आजचे युग हे डिजिटल युग आहे, त्यामुळे आता कागदावर डेटा संग्रहित करण्याऐवजी संगणकाद्वारे डेटाबेसमध्ये संग्रहित केला जातो. या डिजिटल जगात आपण डेटा दोन प्रकारे साठवू शकतो.
१) Temporary Storage
डेटा तात्पुरत्या स्वरूपात रॅममध्ये संग्रहित केला जातो. या अंतर्गत, फक्त तो डेटा संग्रहित केला जातो जो तात्पुरत्या स्वरूपात वापरला जातो, तो बहुतेक संगणक अनुप्रयोगांद्वारे कोणतीही प्रक्रिया किंवा प्रक्रिया चालविण्यासाठी वापरला जातो. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा डेटा हटविला जातो
२) Permanent Storage
डेटा कायमचा संग्रहित करण्यासाठी किंवा संग्रहित करण्यासाठी, तो संगणकाच्या मेमरी मध्ये म्हणजे हार्ड डिस्क किंवा सॉलिड स्टेट ड्राईव्ह मध्ये ठेवला जातो. कायमस्वरूपी स्टोरेजमध्ये संग्रहित केलेला डेटा ठेवला जाऊ शकतो जोपर्यंत तुम्ही तो स्वतः हटवत नाही तोपर्यंत तो डेटा सुरक्षित राहतो. यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहतो. अतिशय महत्त्वाचा डेटा साठवण्यासाठी ही पद्धत चांगली आहे.
डेटा कसा मोजला जातो?
डिजिटल स्वरूपातील डेटा खालील एककांमध्ये मोजला जातो –
1 Bit | 1 Binary Digit |
4 Bits | 1 Nibble |
8 Bit | 1 Byte |
1024 Byte | 1 Kilobyte |
1024 Kilobyte | 1 Megabyte |
1024 Megabyte | 1 Gigabyte |
1024 Gigabyte | 1 Terabyte |
1024 Terabyte | 1 Petabyte |
निष्कर्ष
डेटा (Data) ची माहिती मराठी Data Information in Marathi, हा लेख शेवटपर्यंत वाचल्यानंतर तुम्हाला डेटा म्हणजे काय आणि डेटाचे किती प्रकार आहेत हे समजले असेलच. डेटा बद्दल समजणे फार कठीण नाही कारण या डिजिटल युगात डेटा हा सामान्यतः वापरला जाणारा शब्द आहे.
मी तुम्हाला या लेखाद्वारे डेटाबद्दल संपूर्ण मूलभूत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. आपल्याला जर आजचा हा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.