Antivirus Information in Marathi: आपण जर संगणक किंवा लॅपटॉप वापरत असाल तर Antivirus बद्दल थोडीशी माहिती आपल्याला असेलच. कॉम्पुटर वायरस आपल्या संगणकासाठी खूप हानिकारक असतो, त्यामुळे वायरस ला रोखण्यासाठी Antivirus कॉम्पुटर मध्ये असावा लागतो. कॉम्पुटर मेमरी मध्ये अनेक महत्त्वाच्या फाईल असतात, यासोबतच वयक्तिक फोटो, विडिओ, ई गोष्टी आपण संगणक मध्ये स्टोर करून ठेवत असतो. संगणकीय वायरस या महत्त्वाच्या फाईल वर घात करते व त्यांना नुकसान पोहोचवते, त्यामुळे त्या निकामी होऊन जातात.
आपल्या कॉम्पुटर ला जर वायरस पासून दूर ठेवायचे असेल तर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इंस्टॉल करावे लागते. अँटीव्हायरस सॉफ्टवेअरकडे संगणकाला वायरस पासून सुरक्षित ठेवण्याची क्षमता असते. कॉम्पुटर क्षेत्रात AntiVirus चा खूप मोठा उपयोग असतो, त्यामुळे प्रत्येकाला याबद्दल माहिती असायला हवी. आपणही AntiVirus बद्दल माहिती, Antivirus in Marathi जाणून घेण्यास इच्छुक असाल तर आपण बरोबर ठिकाणी आला आहात.
अँटीव्हायरस ची माहिती मराठी Antivirus Information in Marathi
आपण या लेख मध्ये Computer मध्ये वापरल्या जाणाऱ्या Antivirus सॉफ्टवेअर बद्दल माहिती घेणार आहोत. Antivirus कसे कार्य करते, याचे फायदे, तोटे अशी सर्व मूळ व महत्वाची माहिती या लेख मध्ये एकत्रित केलेली आहे. अँटीव्हायरस बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटच्या शब्दापर्यंत वाचावा.
अँटीव्हायरस म्हणजे काय?
अँटीव्हायरस किंवा अँटीव्हायरस सॉफ्टवेअर ज्याला Anti-Malware या नावानेही ओळखले जाते, हे एक विशिष्ट कॉम्पुटर सॉफ्टवेअर आहे जे मालवेअर शोधण्यासाठी, त्यावर प्रतिबंध करण्यासाठी व मालवेअर ला संगणक प्रणालीतून काढून टाकण्यासाठी वापरले जाते. अँटीव्हायरस म्हणजे प्रोग्रामिंग केलेला एक कोड असतो. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर अँटीव्हायरस एक सॉफ्टवेअर आहे जे संगणक च्या प्रोग्रॅम्स मधील सर्व वायरस शोधते व संगणक मधून काढून टाकते.
अँटीव्हायरस संगणकाला Spyware, Adware, Ransomware, Keyloggers, Backdoors, Trojan Horse, ई हानिकारक वायरस पासून सुरक्षित ठेवते. संगणक मेमरी मधील सर्व फाईल ला सुरक्षा प्रदान करून अँटीव्हायरस हे सुरक्षा गार्ड सारखे काम करते. फक्त हे नाही तर नवीन अपडेट केलेले अँटीव्हायरस सोशल इंजिनिअरिंग, इंटरनेट बँकिंग, फिशिंग, ई मधून होत असलेल्या ऑनलाईन हल्ल्यांपासून आपल्याला दूर ठेवते.
इतिहास काय आहे?
सर्वात पहिल्या संगणकीय वायरस चा जन्म ७० वर्षांपूर्वी झाला होता. त्याचे नाव Creeper असे होते. या वायरस ला १९७१ मध्ये बॉब थॉमस यांनी प्रयोगासाठी BBN Technologies कंपनी मध्ये बनवले होते. खरे तर हा वायरस नसून एक प्रायोगिक प्रोग्राम होता. मेन फ्रेम संगणकात हा Creeper प्रोग्राम विशिष्ट कार्यासाठी ठेवण्यात आलेला होता.
त्याच वर्षी एक शाश्रज्ञ नाव रे टॉमलिंसोन याने Creeper या प्रोग्राम ला अपडेट केले. त्याने याला Reaper असे नाव दिले. रे टॉमलिंसोन हे बॉब थॉमस चे सहाय्यक कामगार होते. आता या अपडेट केलेल्या Reaper ला आधीच्या Creeper च्या जागी बदली करायचे होते. त्यासाठी एक विशिष्ट तंत्रज्ञान वापरून सर्व संगणक ज्यात Creeper आहे त्यामध्ये Creeper ची बदली Reaper शी ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली.
Reaper Program मध्ये Creeper चा शोध घेऊन त्याला हटवून टाकण्याचे वैशिष्ट्य विकसित करण्यात आले होते. याच घटनेतून Antivirus ची संकल्पना समोर आली. तेव्हापासून Creeper का जगातील पहिला वायरस आणि Reaper ला जगातील पहिला अँटीव्हायरस म्हटले गेले. १९८७ मध्ये आलेल्या Vienna Virus ला काढून टाकण्यासाठी जर्मन सुरक्षा तज्ञ Bernd Fix यांनी याच पद्धतीचा वापर करून एंटीवायरस चा यशस्वी निर्माण केला होता.
कसे कार्य करते अँटीव्हायरस?
अँटीव्हायरस ला संगणक मध्ये टाकण्यासाठी आपल्याला सर्वात आधी ते डाउनलोड करून इंस्टॉल करावे लागते. अँटीव्हायरस ला इंस्टॉल केल्यावर त्यांचे कार्य सुरू होते. अँटीव्हायरस संगणकाच्या प्रोग्रॅम्स मध्ये घुसते व सर्व कोड स्कॅन करण्यास सुरुवात करते. संगणक मधील सर्व फाईल स्कॅन करण्यास सुरुवात करते व विविध स्कॅनिंग तंत्रज्ञान वापरून संगणक मधील वायरस शोधून काढते. अँटीव्हायरस संगणक मधील वायरस शोधण्यासाठी खालील पद्धतींचा वापर करते.
- १) Heuristic Based Detection
- २) Sandbox Detection
- ३) Signature Based Detection
- ४) Data Mining Detection
- ५) Behavioural Based Detection
संगणक मधील वायरस शोधून एंटीवायरस त्याला कायमस्वरूपी साठी हटवून टाकते व संगणकातील फाईल्स सुरक्षित करते.
अँटीव्हायरस ऑनलाईन पद्धतीने इंटरनेट वरून येणाऱ्या नवीन वायरस ला संगणक पासून दूर ठेवते. इंटरनेट वर आपण जर असुरक्षित वेबसाईटवर गेलो तर अँटीव्हायरस लगेच आपल्याला सूचित करते किंवा कोणती फाईल डाउनलोड करायची असेल तर अँटीव्हायरस सर्वात पहिले ती स्कॅन करते व सुरक्षित असेल तरच डाउनलोड करण्यास परवानगी देते.
प्रकार कोणते आहेत?
संगणकाचे मालवेअर, व्हायरस आणि इतर सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर हे आवश्यक टूल आहे. अनेक प्रकारचे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर उपलब्ध असल्याने, तुमच्यासाठी कोणते योग्य आहे हे ठरवणे कठीण असू शकते. येथे आपण अँटीव्हायरस चे प्रकार पाहुयात.
१) Traditional Antivirus Software –
या प्रकारचे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर इन्स्टॉल केलेले असतात आणि व्हायरस आणि मालवेअर शोधण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी बॅकग्राउंडमध्ये रन होतात. हे सॉफ्टवेअर कॉम्पुटर मधल्या सर्व फाईल्स, इमेल स्कॅन करतात आणि जर काही धोकादायक आढळले तर तुम्हाला सूचित करतात.
२) Cloud-based Antivirus Software –
हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर क्लाउडमध्ये चालतात, याचा अर्थ ते आपल्या संगणकावर इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नसते. त्याऐवजी, हे सॉफ्टवेअर आपले कॉम्पुटर रिअल टाइम मध्ये स्कॅन करतात आणि धोके शोधतात. क्लाउड-आधारित अँटीव्हायरस सॉफ्टवेअर विशेषतः अशा व्यवसायांसाठी उपयुक्त आहे ज्यांना एकाधिक उपकरणांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
३) Internet Security Suites –
Internet Security Suites अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह अँटीव्हायरस सॉफ्टवेअर एकत्र करतात, जसे की फायरवॉल, अँटी-फिशिंग संरक्षण आणि parental controls. हे सूट सायबर धोक्यांच्या विस्तृत श्रेणीपासून सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
४) Mobile Antivirus Software –
मोबाइल अँटीव्हायरस सॉफ्टवेअर विशेषतः स्मार्टफोन आणि टॅब्लेटसाठी डिझाइन केले आहे. हे तुमच्या मोबाइल डिव्हाइसचे व्हायरस, मालवेअर आणि इतर सायबर धोक्यांपासून संरक्षण करते आणि यामध्ये अँटी-थेफ्ट संरक्षण आणि गोपनीयता नियंत्रणे यासारखी वैशिष्ट्ये समाविष्ट असतात.
५) Free antivirus software –
अनेक अँटीव्हायरस सॉफ्टवेअर प्रदाते त्यांच्या सॉफ्टवेअरच्या विनामूल्य आवृत्त्या देतात, जे व्हायरस आणि मालवेअरपासून मूलभूत संरक्षण प्रदान करतात. तथापि, विनामूल्य अँटीव्हायरस सॉफ्टवेअरमध्ये सशुल्क आवृत्त्यांमध्ये आढळणारी काही वैशिष्ट्ये नसतात.
फायदे आणि तोटे?
अँटीव्हायरस संगणक सुरक्षेसाठी एक वरदान ठरले आहे, पण असे नाही की अँटीव्हायरस पूर्णपणे संगणक साठी योग्य असते कारण अँटीव्हायरस चे काही तोटे सुद्धा आहेत. तर चला आता अँटीव्हायरस चे Advantages आणि Disadvantages जाणून घेऊयात.
फायदे
- १) संगणकला वायरस पासून सुरक्षित ठेवते.
- २) ऑनलाईन होणाऱ्या मालवेअर हल्ल्यापासून आपल्या डेटा ला सुरक्षित ठेवते.
- ३) वायरस असलेल्या फाईल्स डाउनलोड करण्यापासून संगणकला रोखून ठेवते.
- ४) ऑनलाईन व्यवहाराला सुरक्षा प्रदान करते.
- ५) हार्ड डिस्क ला Corrupt होण्यापासून वाचवते.
तोटे
- १) अँटीव्हायरस फुकट मिळत नाही त्यासाठी पैसे मोजावे लागतात.
- २) अँटीव्हायरस असल्यावर सिस्टम चा वेग कमी होतो.
- ३) अँटीव्हायरस ला जर कोणती Corrupt फाईल Repair नाही झाली तर त्या फाईल ला डिलीट करून टाकते.
- ४) अँटीव्हायरस ला अपडेट नाही केले तर ते चांगले काम करत नाही.
- ५) अँटीव्हायरस वर पूर्णपणे निर्भर राहता येत नाही, काही काळजी आपणही घ्यावी लागते.
काही लोकप्रिय अँटीव्हायरस
आपल्याला जर डेस्कटॉप कॉम्पुटर साठी किंवा लॅपटॉप साठी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर विकत घ्यायचे असेल तर खालील नावे आपल्यासाठी उपयुक्त ठरतील.
- Bitdefender Antivirus Plus
- Kaspersky Anti-Virus
- McAfee AntiVirus Plus
- Webroot SecureAnywhere AntiVirus
- ESET NOD32 Antivirus
- Malwarebytes Premium
- Norton AntiVirus Plus
- Sophos Home Premium
- F-Secure Anti-Virus
निष्कर्ष
आपल्याला माहीतच असेल की आताचे तंत्रज्ञानाचे युग आहे. या युगात ऑनलाईन जगातील सुरक्षा खूप महत्त्वाची असते. त्यासाठी आपल्या संगणक ला वायरस पासून दूर ठेवावे लागते. जेणेकरून आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील. त्यासाठी कॉम्पुटर मध्ये अँटीव्हायरस इंस्टॉल असावे लागते हे आपण पाहिले.
या लेखमध्ये आपण अँटीव्हायरस बद्दल ज्ञान मिळवले आहे. अँटीव्हायरस कसे कार्य करते हे पण आपण जाणून घेतले आहे. मला आशा आहे की आपल्याला Antivirus Information समजली असेल. तरीही काही शंका असेल तर खाली कंमेंट करू शकता आपल्याला जर काही प्रश्न असेल ते खाली कंमेंट करून विचारू शकता.
Antivirus च्या या लेख मध्ये काही महत्वाची नवीन माहिती मिळाली असेल तर मित्रांसोबत शेअर नक्की करा. कॉम्पुटर बद्दल अश्याच माहितीसाठी या ब्लॉगला Subscribe नक्की करा, त्याने आमचे लेख आपण सर्वात आधी वाचू शकता.