एटीएम (ATM) चा फुल फॉर्म (ATM Full Form in Marathi)

ATM Full Form – एटीएम हा शब्द न ऐकलेला व्यक्ती सापडूनही सापडणार नाही, कारण एटीएम हा शब्द मानवाच्या दैनंदिन जीवनात अनेकदा येत असतो. आपल्यापैकी प्रत्येकाने ATM Machine वापरली असेल किंवा पाहिली तरी असेलच.

एटीएम मशीन ही आपला वेळ वाचवणारी एक महत्वाची मशीन आहे, त्यामुळे ज्यांनी कोणी ही वापरली नसेल त्यांनी पण वापर सुरू करावा. बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी खूप वेळ लागतो हा वेळ वाचवण्यासाठी ATM मशीन चा निर्माण केलेला आहे. ATM मशीन च्या मदतीने आपल्या बँक खात्यातून (Bank Account) पैसे काढता येतात.

सर्वात आश्चर्यकारक गोस्ट म्हणजे दैनंदिन जीवनात वापर होणाऱ्या या ATM चा फुल फॉर्म अनेक लोकांना माहिती नसतो. यामुळे आपण या पोस्ट मध्ये ATM Full Form जाणून घेणार आहोत व यासोबतच सामान्य ज्ञान म्हणून एटीएम ची थोडक्यात माहिती पण पाहणार आहोत.

एटीएम चा फुल फॉर्म मराठी (ATM Full Form in Marathi)

एटीएम ही एक स्वयंचलित मशीन आहे जिच्या मदतीने व्यक्ती बँकेत न जाता खात्यातून पैसे काढू शकतो. ATM चा फुल फॉर्म Automated Teller Machine असा होतो, मराठी मध्ये पाहिले तर स्वयंचलित टेलर मशीन असा याचा अर्थ होतो. बँकेतील गर्दी कमी करण्यासाठी व लोकांचा वेळ वाचवण्यासाठी या मशीन चा निर्माण करण्यात आला आहे.

ATM Full Form in Marathi :Automated Teller Machine
एटीएम मराठी अर्थ :स्वयंचलित टेलर मशीन
अविष्कारक :जॉन शेफर्ड-बॅरन
प्रथम वापर :27 जून 1967 (लंडन)

जगात सर्वात आधी 27 जून 1967 मध्ये ATM चा वापर केले गेला. लंडन मधील एका बँकेने ATM मशीन विकत घेतली व ग्राहकांसाठी वापरण्यास सुरू केली. जॉन शेफर्ड-बॅरन यांनी ही एटीएम मशीन बनवली होती. यांचा जन्म ब्रिटिशकालीन भारतात 23 जून 1925 रोजी मेघालय येथील शिलॉंग येथे झाला होता. ATM मशीन चा निर्माण केल्यामुळे जॉन शेफर्ड-बॅरन याना एटीएम चे जनक म्हटले जाते.

एटीएम मशीन चा वापर करण्यासाठी एका कार्ड ची आवश्यकता लागते त्याला ATM कार्ड असे म्हणतात. हे कार्ड मशीन मध्ये टाकल्यावरच पैसे काढता येतात. कार्ड सोबतच एक चार अंकी सुरक्षा कोड सुदधा असतो, तो योग्य टाकल्याशिवाय पैसे काढता येत नाहीत. ATM कार्ड हे इलेक्ट्रॉनिक्स चे विशिष्ट गुणधर्म वापरून बनवलेले असते. ATM मशीन चा वापर हा पूर्णपणे सुरक्षित असतो व कोणत्याही व्यक्तीला वापरता येईल इतकी सोपी प्रक्रिया असते.

महत्वाचे...
  • एटीएम मशीन चा शोध जॉन शेफर्ड बेरोन यांनी १९६७ मध्ये लावला.
  • २७ जून १९६७ रोजी लंडन च्या Barclays Bank या बँकेत एटीएम मशीन सुरु केली व कॉमेडियन ऍक्टर रेग वर्णी हे एटीएम मशीन मधून पैसे काढणारे पहिले व्यक्ती आहेत.
  • जॉन शेफर्ड बेरोन यांनी एटीएम मशीन चा पिन ६ अंकाचा ठेवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु ६ अंकाचा पिन कोड त्यांच्या बायकोच्या लक्षात राहत नव्हता त्यामुळे त्यांनी ४ अंकाचा पिन कोड ठेवला.
  • अबू धाबी मध्ये एक अशी एटीएम मशीन आहे जीतून चक्क सोने काढता येते.

निष्कर्ष

मित्रानो, मला आशा आहे की आपल्याला एटीएम चा फुल फॉर्म, ATM Full Form व काही महत्वाची माहिती समजली असेल. आपल्यापैकी जर कोणी ATM वापरताना भीत असेल तर त्याने कोणाकडून तरी शिकून घावे व वापरायला सुरू करावे, कारण आपला वेळ वाचवण्यासाठी ATM मशीन एक महत्त्वाचे योगदान देण्यात सहाय्यक आहे.

आजचा ATM Full Form हा माहितीपूर्ण लेख कसा वाटला हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही सोशल मीडिया च्या मदतीने हा लेख शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही माहिती मिळेल. याच प्रकारच्या अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन या वेबसाईटला वारंवार भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment