Computer Hardware in Marathi: कॉम्पुटर हार्डवेअर म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Computer Hardware in Marathi: संगणक हे मानवाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनले आहे. एक काळ होता, ज्यावेळी कदाचित एखाद्या ठिकाणी संगणक असायचे. आताच्या 21 व्या शतकात प्रत्येक व्यक्तीच्या घरी संगणक आहे, शाळा, कॉलेज मध्ये संगणक आहे. विशेष म्हणजे आपल्या हातातला मोबाईल सुद्धा संगणकाचा च एक प्रकार आहे. विविध पार्टस पासून संगणक बनलेले असते, यांना दोन मुख्य प्रकारांमध्ये विभाजित केलेले आहे, 1) सॉफ्टवेअर, 2) हार्डवेअर.

कॉम्पुटर सॉफ्टवेअर ची माहिती आपण मागील लेख मध्ये घेतलेली आहे. आता या लेखामध्ये आपण संगणकाच्या हार्डवेअर ची माहिती Computer Hardware Information समजून घेणार आहोत. हार्डवेअर म्हणजे संगणकाचे भाग ज्यांना आपण स्पर्ष करू शकतो, पाहू शकतो. तर चला आता आपण हार्डवेअर म्हणजे काय, What is Computer Hardware in Marathi हे विस्तारित पाहुयात.

हार्डवेअर म्हणजे काय? (Hardware in Marathi)

संगणकाचे असे भाग ज्यांना स्पर्ष करता येते, डोळ्यांने पाहता येते, त्या भागांना संगणकाचे हार्डवेअर असे म्हणतात. हार्डवेअर भाग हे संगणकाचे भौतिक भाग असतात, यांना एकमेकांशी जोडून संगणकाची पूर्ण रचना केलेली असते. उदा… माऊस, कीबोर्ड, मॉनिटर, प्रिंटर, कॅबिनेट, ई. मानवाच्या शरीराप्रमाने संगणकाचे सुद्धा शरीर असते आणि हार्डवेअर पार्टस म्हणजे संगणकाचे अवयव असतात.

सॉफ्टवेअर ला हार्डवेअर मध्ये इंस्टॉल केले जाते, म्हणजेच जीव टाकला जातो व हार्डवेअर कार्य करण्यास तयार होते. सॉफ्टवेअर शिवाय हार्डवेअर आणि हार्डवेअर शिवाय सॉफ्टवेअर चा काहीही उपयोग संगणक मध्ये होत नाही. हे दोन्ही जेंव्हा एकत्र असणार तेव्हाच ते वापरले जाऊ शकतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक मशीन ला कार्य करण्यास सक्षम बनवण्यासाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ची आवश्यकता असते.

हार्डवेअर पार्टस ला केव्हाही बदलता येते, बिघाड झाल्यास आपण हार्डवेअर का सहज दुरुस्त करू शकतो किंवा बदलू शकतो. सॉफ्टवेअर सहजपणे खराब होत नाही, सॉफ्टवेअर क्रॅश होण्याचे प्रमाण खूप कमी असते. हार्डवेअर पार्टस अपग्रेड करण्याची सुविधा सुद्धा असते, गरज लागल्यास आपण अपग्रेड करू शकतो. आपण हा लेख ज्यावर वाचत आहात तो मॉनिटर आणि मोबाईल स्क्रीन हे हार्डवेअर भाग आहेत.

हार्डवेअर चे प्रकार (Types of Hardware in Marathi)

संगणकाच्या हार्डवेअर भागांचे वेगवेगळे उपयोग आणि वैशिष्ट्ये आहेत, याच्या आधारावर भागांना विभाजित केले जाते. हार्डवेअर भागांच्या प्रकारांची सविस्तर माहिती घेऊयात.

1) सिस्टम युनिट

सिस्टम युनिट हा एक खोका असतो, यात कॉम्पुटर चे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जोडलेली असतात. कॉम्पुटर च्या शेजारी एक आयताकृती उभा बॉक्स असतो, याला आपण CPU नावाने ओळखतो पण याचे खरे नाव सिस्टम युनिट किंवा कॅबिनेट आहे.

2) इनपुट उपकरणे

यूजर ने दिलेल्या सूचना संगणक पर्यंत पोहचवण्याचे कार्य Input Devices चे असते. इनपुट उपकरणे यूजर द्वारे चालवले किंवा हाताळली जातात. यूजर आपले आदेश इनपुट उपकरणांच्या सहाय्याने संगणकाकडे पाठवतो व हवे ते कार्ये संगणक कडून करून घेतो.

  • माऊस
  • कीबोर्ड
  • स्पीकर
  • टचस्क्रीन

3) आउटपुट उपकरणे

संगणकाने प्रदान केलेल्या आउटपुट सिग्नल ला मानवाला समजण्यास योग्य बनवण्याचे कार्य आउटपुट उपकरणे करतात. संगणकावर करत असलेले सर्व कार्यांचे आउटपुट आपल्याला मॉनिटर किंवा मोबाईल स्क्रीन चालू स्थितीत दर्शवते ही आउटपुट उपकरणे आहेत.

4) इंटर्नल उपकरणे

सिस्टम युनिट च्या आतमध्ये ठेवलेल्या उपकरणांना Internal Devices असे म्हणतात. ही उपकरणे नाजूक असतात व यांचा यूजर शी कोणताही संपर्क नसतो, त्यामुळे यांना आतमध्ये ठेवणे सुरक्षित असते. सुरक्षितता साठी त्यांना Computer Case मध्ये ठेवले जाते. या मध्ये स्टोरेज उपकरणे, प्रोसेसिंग उपकरणे, व अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश असतो.

5) कमुनिकेशन उपकरणे

एका कॉम्पुटर ला दुसऱ्या कॉम्पुटर सोबत संपर्क करण्यासाठी Communication Devices वापरली जातात. मोडेम हे एक लोकप्रिय Communication उपकरण आहे.

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधील फरक

    आतापर्यंत आपण पाहिले की सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोन्हीही संगणकाचे अतिमहत्वाचे घटक आहेत. कॉम्पुटर साठी यांचे वेगवेगळे कार्य असते. खाली दिलेल्या टेबल पासून आपल्याला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मध्ये काय फरक असतो हे समजेल.

हार्डवेअरसॉफ्टवेअर
1) हार्डवेअर हे भौतिक उपकरण असतात, यांना स्पर्श करता येते व हे दृश्यमान असतात.1) सॉफ्टवेअर हा सूचनांचा किंवा आदेशाचा एक प्रोग्राम असतो, याला स्पर्ष करता येत नाही कारण सॉफ्टवेअर चे भौतिक अस्तिस्व नसते.
2) हार्डवेअर ला भौतिक वस्तूंपासून बनवले जाते.2) सॉफ्टवेअर बनवण्यासाठी प्रोग्रामिंग भाषेत सूचना लिहावा लागतात, यांना प्रोग्राम असेही म्हणतात.
3) हार्डवेअर हे सॉफ्टवेअर च्या आधारावर कार्य करतात.3) सॉफ्टवेअर कॉम्पुटर ची कार्ये संचालित करतात.
4) हार्डवेअर खराब झाल्यावर दुरुस्त करता येते किंवा नवीन बदलता येते.4) सॉफ्टवेअर मध्ये बिघाड झाल्यावर याला Backup File मधून री-इंस्टॉल करून परत आणता येते.
5) हार्डवेअर शिवाय कॉम्पुटर चे आणि सॉफ्टवेअर चे सुद्धा कोणतेही अस्तित्व नाही.5) सॉफ्टवेअर शिवाय कॉम्पुटर कार्य करत नाही, आउटपुट आणि इनपुट प्रक्रिया पार पडत नाही.

निष्कर्ष –

मला आशा आहे की हार्डवेअर ची माहिती Hardware Information in Marathi आपल्याला योग्य रित्या अवगत झाली आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हीही संगणकाचे महत्वाचे भाग आहेत, यामुळे यांची माहिती असणे महत्त्वाचे असते. मला शक्य आहे तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न मी केला आहे.

आपल्याला जर हार्डवेअर ची माहिती या लेखामध्ये काही नवीन शिकायला मिळाले असेल तर ही माहिती मित्रांना शेअर करायला विसरू नका. आजचा लेख कसा वाटला हे मला कंमेंट करून नक्की कळवा. नवीन तंत्रज्ञान, संगणक, ब्लॉगिंग या विषयांवर माहिती मिळवण्यासाठी मराठी ऑनलाईन या ब्लॉगवर पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

लेख आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करावा.

Leave a Comment