Google Bard AI in Marathi – गुगलने सादर केलेला अत्याधुनिक AI Chatbot हा तंत्रज्ञानाच्या जगात प्रसिद्ध होत आहे, त्याचे नाव आहे Google AI Bard. गुगल द्वारे हे नवीन तंत्रज्ञान लॉन्च करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे ChatGPT, कारण ChatGPT ला स्पर्धा देण्यासाठी गुगल ने Bard AI लाँच केले आहे. Google चे CEO, सुंदर पिचाई यांनी अधिकृत ब्लॉग पोस्टद्वारे Google Bard AI Chatbot बद्दल माहिती शेअर केली आहे आणि आज मी तुम्हाला Bard AI बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तुम्हाला कदाचित माहित असेल की Google स्मार्ट होण्यासाठी आधीपासूनच Google Lens आणि Google Assistant मध्ये AI चा वापर करत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यात गुगल बार्ड मध्ये वेगळे काय आहे? तर ते तुम्हाला या पोस्टमध्ये कळेल. बार्ड हे तुम्ही विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास सक्षम आहे. हे कसे शक्य आहे यासाठी गुगल बार्ड बद्दल समजून घ्यावे लागेल. तर मग चला जास्त वेळ न घालवता Bard AI काय आहे हे पाहुयात.
Google Bard AI काय आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती (Google Bard AI in Marathi)
Google Bard ही एक AI चॅट सेवा आहे जी वापरकर्त्यांसाठी अधिक वैयक्तिकृत शोध अनुभव प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. हे त्याच संभाषणात्मक AI ChatBot वर आधारित आहे जे Google स्वतःच्या शोध इंजिनसाठी वापरते आणि ChatGPT च्या लोकप्रियतेला प्रतिसाद म्हणून पाहिले जाते.
गुगल बार्ड AI (Google Bard AI in Marathi)
Google Bard AI ही OpenAI च्या ChatGPT प्रमाणे काम करण्यासाठी डिझाइन केलेली एक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट सेवा आहे. Bard हे Google च्या स्वतःच्या conversational AI ChatBot आणि एक नैसर्गिक भाषा प्रक्रिया साधन LaMDA वर आधारित आहे. ही सेवा अधिक अचूक आणि वैयक्तिकृत शोध परिणाम प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
नाव – | गुगल बार्ड (Google Bard) |
लाँच – | 10 मे 2023 |
निर्माता – | गुगल आणि अल्फाबेट |
मुख्य प्रतिस्पर्धी – | ChatGPT |
वेबसाईट – | bard.google.com |
Google Bard हे LaMDA तंत्रज्ञान वापरून तयार केले आहे, ही Google ची नवीन Artificial Intelligence आधारित चॅटबॉट सेवा आहे. गुगल कंपनीच्या सीईओने याला “Experimental Conversational AI Service” म्हटले आहे. Google Bard च्या नवीन अपडेट नुसार सर्वात शक्तिशाली AI मॉडेल Gemini AI चा समावेश यात करण्यात आलेला आहे, यामुळे Bard ची क्षमता वाढली आहे. Bard AI आपल्यासोबत संवाद साधते आणि आपल्याला हवी असलेली माहिती प्रदान करते. यामध्ये गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर केला आहे ज्यामुळे हे इंटरनेट च्या मदतीने स्वतः तुमच्या प्रश्नांची उत्तरे बनवते.
गुगल बार्डचा इतिहास (History of Bard AI)
Bard AI हे एक large language model (LLM) आहे जी Google AI द्वारे विकसित केलेले आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात याची घोषणा करण्यात आली. Bard AI हे एका मोठ्या डेटा सेटवर train केले गेले आहे आणि मजकूर तयार करू शकते, भाषांतर करू शकते, बी विविध प्रकारचे कंटेंट लिहू शकते आणि तुमच्या प्रश्नांची माहितीपूर्ण पद्धतीने उत्तरे देऊ शकते.
Google Bard ची घोषणा 6 फेब्रुवारी रोजी Google आणि Alphabet चे CEO सुंदर पिचाई यांनी केली होती. त्यांनतर CEO सुंदर पिचाई यांनी 10 मे 2023 रोजी Google I/O नावाच्या कार्यक्रमात Google Bard AI लाँच केले. हा कार्यक्रम Google च्या माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात आयोजित केला होता.
Bard AI चे नाव गॉथिक कवि जॉन किट्सच्या कवितेतील एका ओळीवरून पडले आहे: “एक बार्ड, एक देवदूत, एक शहीद, एक राजा.” किट्स या ओळीत एक महान कवीचे वर्णन करत आहेत जो लोकांना त्यांच्या भावना आणि अनुभवांशी जोडतो. Bard AI च्या निर्मात्यांनी ही ओळ निवडली कारण ते या मॉडेलला एक शक्तिशाली साधन बनवू इच्छित होते जे लोकांना एकमेकांशी जोडू शकेल आणि त्यांना नवीन विचार आणि कल्पनांशी परिचित करू शकेल.
गुगल बार्ड कसे कार्य करते? (How Does Bard AI Works)
वरती सांगितल्याप्रमाणे Google Bard AI हे LLM वापरून कार्य करते. आधी Bard AI हे LaMDA नेटवर्कच्या आधारावर काम करायचे आणि ते आता PaLM 2 नावाच्या नेटवर्कवर स्विच केले आहे, ज्यामुळे आता बार्डद्वारे कोडींगसारख्या गोष्टीही सहज करता येतील.
याशिवाय तुम्ही चॅट जीपीटी वापरता त्याच पद्धतीने प्रश्न विचारू शकता. जेव्हा तुम्ही Google Bard AI ला प्रश्न विचारता तेव्हा ते LaMDA आणि PALM 2 नेटवर्क वापरते आणि तुम्हाला योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करते.
गुगल बार्ड AI हे सध्या trial मोड मधे आहे आणि ते अजून develope होत आहे, तरी हे कशे कार्य करते यावर आता तरी सांगता येत नाही.
गुगल बार्ड कसे वापरावे? (How to use Bard AI)
मी येथे तुम्हाला खाली काही स्टेप्स देणार आहे, जेणेकरून तुम्ही देखील Google Bard AI अगदी सहज वापरण्यास सक्षम व्हाल.
- आपल्या डिवाइस वर कोणतेही ब्राउजर ओपन करा आणि Bard AI सर्च करा किंवा bard.google.com या लिंकवर क्लिक करा.
- सर्वात पहिल्या वेबसाईट वर जा आणि आपल्या गुगल खात्याद्वारे Sign in करा.
- Sign in केल्यावर तुमच्या समोर पुढील पेज उघडेल, जिथे तुम्हाला Terms and Conditions दिसतील ज्या तुम्हाला स्वीकाराव्या लागतील.
- आता तुमच्या समोर एक नवीन पॉप अप ओपन होईल जिथे तुम्हाला Bard in Experiment चा पर्याय दिसेल, येथे तुम्हाला Continue बटन वरती क्लिक करायचे आहे.
- आता तुम्ही Bard AI वापरायला तयार आहात, आपल्याला वाटेल ते प्रश्न तुम्ही Bard AI विचारू शकता.
गुगल बार्डची वैशिष्ट्ये (Features of Bard AI)
Google Bard AI देखील Chat GPT प्रमाणे काम करते. हे माहिती generate करते, माहितीचे भाषांतर करते, प्रश्नांची उत्तरे देते आणि इतर अनेक गोष्टी करते. बार्डचा वापर सामान्यतः अचूक शोध इंजिन परिणाम सोबत सोप्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी केला जातो.
- Bard AI चॅटबॉटमध्ये वापरकर्त्यांना शक्ती, बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता यांचा एकत्रितपणा पाहायला मिळेल.
- Bard AI हे वापरकर्त्यांचे प्रतिसाद आणि वेबवरून माहिती गोळा करते.
- सुरुवातीच्या चाचणी हेतूंसाठी ही LaMDA ची lite मॉडेल आवृत्ती असायची पण आता PaLM 2 वर स्विच केली आहे. या कारणास्तव, बार्डचे तर्क कौशल्य आणि प्रगत गणित तसेच कोडिंग क्षमता पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे आणि आता ती पूर्वीपेक्षा अधिक हायटेक झाली आहे.
- आत्तापर्यंत गुगल बार्ड फक्त इंग्रजी भाषेतच उपलब्ध होता पण आता त्यात हिंदी सोबतच इतर ४० भाषांचाही समावेश करण्यात आला आहे.
- Bard AI ला भविष्यात अधिक मजबूत करण्यासाठी गुगल अभिप्राय घेत आहे.
गुगल बार्ड चे उपयोग (Uses of Google Bard)
- Google Bard भाषा समजून घेऊ शकते आणि विविध स्वरूपात माहिती तयार करू शकते. हे मजकूर, प्रतिमा आणि आवाज यासारख्या विविध प्रकारच्या इनपुटचा वापर करून करता येते. उदाहरणार्थ, आपण Google Bard ला “एक कविता लिहा” असे विचारले तर ते एक कविता लिहून देते.
- Google Bard हे कोडींग साठी वापरले जाते. हे 20 पेक्षा जास्त कोडिंग भाषांमध्ये कार्य करू शकते. उदाहरणार्थ, आपण Google Bard ला “एक वेबसाइट तयार करा” असे विचारले तर ते एक वेबसाइट तयार करून देईल.
- Google Bard प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. हे विविध विषयांवर प्रश्नांची उत्तरे देऊ शकते. उदाहरणार्थ, आपण Google Bard ला “सूर्य किती मोठा आहे?” असे विचारले तर ते सूर्याच्या आकाराबद्दल माहिती देईल.
- Google Bard माहितीचे सत्यापन करण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. हे Google शोध इंजिनचा वापर करून माहितीची अचूकता तपासू शकते. उदाहरणार्थ, आपण Google Bard ला “महाभारताचा इतिहास काय आहे?” असे विचारले तर ते महाभारताच्या इतिहासाची तथ्यात्मक माहिती प्रदान करेल.
- Google Bard माहिती शेअर करण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. हे Gmail किंवा Google Docs सारख्या सेवांद्वारे माहिती शेअर करू शकते. उदाहरणार्थ, आपण Google Bard ला “माझ्या मित्राला हा लेख पाठवा” असे विचारले तर ते तो लेख आपल्या मित्राला पाठवेल.
FAQ’s
-
गुगल बार्ड AI काय आहे?
बार्ड हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ऑनलाइन चॅटबॉट आहे आणि हे वापरकर्त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकते. याचा निर्माण गुगल ने केला आहे.
-
गुगल बार्ड लाँच कधी झाले आहे?
गुगल बार्ड 10 मे 2023 रोजी लाँच करण्यात आलेले आहे.
-
गुगल बार्ड चा मालक कोण आहे?
गुगल बार्ड ची मालकी गुगल अल्फाबेट कंपनीकडे आहे.
-
Google Bard AI आल्याने Google सर्च इंजिन बंद होईल का?
नाही, Google सर्च इंजिन बंद होणार नाही.
-
गुगल बार्डमध्ये प्रवेश कसा करावा?
पुढील लिंक वरती क्लिक करून तुम्ही बार्डमध्ये प्रवेश करू शकता – bard.google.com