इंस्टाग्राम काय आहे? कोणी लावला शोध, संपूर्ण माहिती मराठी

आपण Instagram बद्दल नक्कीच ऐकले असेल, हे एक लोकप्रिय Social Media Platform आहे जेथे लोक Photo, Video शेअर करत करतात. सध्याच्या काळात इंस्टाग्राम वापरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे आणि Instagram Reels हे फिचर सुद्धा त्याला कारणीभूत आहे. करोडो लोक आणि सेलिब्रिटी सुद्धा या Social Media Platform वर त्यांच्या Followers सोबत त्यांच्या आयुष्यातील क्षण शेअर करतात.

इंस्टाग्रामचे काही वैशिष्ट्ये आहेत जी त्याला इतर Social Media Platform पेक्षा वरचढ ठेवतात, फीचर्स अशा प्रकारे आहेत की आपल्याला त्याचे व्यसन लागू शकते. आज महिन्याभरातील सक्रिय वापरकर्त्यांच्या बाबतीत इंस्टाग्रामने फेसबुक सारख्या मोठ्या Social Media ला ही मागे टाकले आहे. अश्या लोकप्रिय इंस्टाग्राम ची माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळे आजच्या पोस्टमध्ये आपण इंस्टाग्राम ची संपूर्ण माहिती घेऊयात.

इंस्टाग्राम ची संपूर्ण माहिती मराठी (Instagram Information in Marathi)

आजची पोस्ट सुरु करण्याआधी आपण पोस्टमध्ये काय जाणून घेणार आहोत हे पाहुयात. यामध्ये आपण इंस्टाग्राम काय आहे, इंस्टाग्राम चा शोध कोणी लावला, यॊबतच इंस्टाग्राम कसे वापरायचे हे सुद्धा पाहणार आहोत. इंस्टाग्राम बद्दल पूर्ण माहिती घेण्यासाठी आजचा लेख शेवटपर्यंत वाचावा. तर चला सुरु करूयात.

इंस्टाग्राम म्हणजे काय आहे?

इंस्टाग्राम हे एक लोकप्रिय Social Networking App आहे, ज्यावर आपण फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतो. Instagram वर अंदाजे एक अब्ज मासिकActive Users आहेत. इतर सोशल नेटवर्क्सप्रमाणेच यातही लाईक, कमेंट, मेसेज आणि टॅग करण्याची सुविधा आहे. इंस्टाग्राम चे लोकप्रिय वैशिष्ट्य म्हणजे स्टोरी शेअरिंग ज्यावर तुम्ही तुमच्या फॉलोअर्सना फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकता. जे 24 तासांनंतर आपोआप हटवले जाते.

App Name :Instagram
Category :Social Media
Developer : Meta Platforms, Inc.
Founder :Kevin Systrom, Mike Krieger
App Size :60.1 MB

इंस्टाग्राम मध्ये लोकांशी कनेक्ट होण्याचा मार्ग Facebook पेक्षा थोडा वेगळा आहे, एखाद्याला Instagram वर मित्र बनवण्यासाठी तुम्हाला त्याला Follow करावे लागेल. जर तो तुम्हाला परत फॉलो करत असेल तर याचा अर्थ तो आता तुमच्या फॉलोअर्सपैकी एक होईल, त्यानंतर तुम्ही दोघेही एकमेकांचे फोटो आणि स्टोरी पाहू शकता आणि त्यांनी तुम्हाला फॉलो नाही केले तर त्यांनी शेअर केलेले फोटो तुमच्या फीडमध्ये दिसतील पण तुमचे फोटो त्यांना दिसणार नाहीत.

इंस्टाग्राम चा शोध कोणी लावला?

इंस्टाग्रामचा शोध केविन शिस्ट्रोम (Kevin Systrom) आणि मॅक क्रीगर (Mike Krieger) यांनी लावला. ते दोघेही कॅलिफोर्निया विद्यापीठ, स्टॅनफोर्डमधील वर्गमित्र होते. त्यांनी 2010 मध्ये इंस्टाग्रामची स्थापना केली आणि 2012 मध्ये फेसबुकने इंस्टाग्राम 1 अब्ज अमेरिकन डॉलरमध्ये विकत घेतले. केविन शिस्ट्रोम हे इंस्टाग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते एक अमेरिकन उद्योजक आणि तंत्रज्ञान व्यावसायिक आहेत. त्यांनी 2004 मध्ये स्टिचफिकेशन, एक सोशल नेटवर्किंग वेबसाइट देखील स्थापन केली.

मॅक क्रीगर हे इंस्टाग्रामचे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत. ते एक अमेरिकन उद्योजक आणि तंत्रज्ञान व्यावसायिक आहेत. त्यांनी 2004 मध्ये स्टिचफिकेशनमध्ये शिस्ट्रोमसोबत काम केले आणि 2010 मध्ये इंस्टाग्रामची स्थापना केली. इंस्टाग्राम हे एक मोबाईल-आधारित सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे जे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी वापरले जाते. हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे, ज्यात 2023 पर्यंत एक अब्जाहून अधिक Active Users आहेत.

इंस्टाग्राम डाउनलोड कसे करायचे?

इंस्टाग्राम डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईल वरती Google Play Store किंवा App Store उघडण्याची असले पाहिजे. इंस्टाग्राम डाउनलोड कसे करायचे हे खाली दिलेले आहे. इंस्टाग्राम डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा –

  • आपल्या Android फोन वरती Google Play Store ओपन करा.
  • सर्च बार उघडून त्यात “Instagram” सर्च करा.
  • इंस्टाग्राम च्या लोगोवरती क्लिक करा.
  • आता “Install” बटन वरती क्लिक करा.
  • App डाउनलोड होण्याची वाट पहा, डाउनलोड झाल्यावर “Open” वरती क्लिक करा.

इंस्टाग्राम डाउनलोड करण्यासाठी तुम्ही Google Play Store किंवा App Store व्यतिरिक्त इतर App Store देखील वापरू शकता. परंतु, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की या स्टोअरमधील Apps, Google Play Store किंवा App Store मधील इतके सुरक्षित नसू शकतात, त्यामुळे सुरक्षित ठिकाणाहूनच डाउनलोड करावे.

इंस्टाग्राम कसे वापरावे?

इंस्टाग्राम चालवायला सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला प्रथम इंस्टाग्राम अकाउंट तयार करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही तुमच्या मोबाइल फोनवर किंवा कॉम्पुटर वर इंस्टाग्राम डाउनलोड करू शकता ते कसे करायचे हे मी वरती सांगितले आहे. इंस्टाग्राम खाते तयार करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा –

  • तुमच्या स्मार्टफोनवर इंस्टाग्राम डाउनलोड करा.
  • Instagram उघडा आणि “Start” वर क्लिक करा.
  • तुमचे नाव, Email Address किंवा फोन नंबर आणि तुमची जन्मतारीख टाका.
  • एक मजबूत पासवर्ड टाका आणि “Next” वर क्लिक करा.
  • आता तुमचा प्रोफाइल फोटो आणि Bio टाका.
  • “Agree and Continue” वरती क्लिक करा.

अश्या प्रकारे इंस्टाग्राम वरती खाते बनवून तुम्ही इंस्टाग्राम वापरायला सुरु करू शकता.

इंस्टाग्राम ची वैशिष्ट्ये कोणती आहेत?

इंस्टाग्रामची अनेक Features आहेत जी Users ना फोटो आणि व्हिडिओ Share करणे, इतर Users शी Connect होणे आणि नवीन Content शोधणे सोपे करतात. इंस्टाग्राम ची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे –

Photo Video Sharing – इंस्टाग्राम Users ना त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सहजपणे Share करण्यास अनुमती देते. तुम्ही तुमच्या कॅमेरा किंवा गॅलरीमधून फोटो आणि व्हिडिओ अपलोड करून पोस्ट करू शकतात त्याला हॅशटॅग्स लावू शकतात आणि शेअर केलेल्या पोस्टला तुमचे फॉलोवर Like आणि Comment सुद्धा करू शकतात.

Connecting with other users – इंस्टाग्राम Users ना एकमेकांला फॉलो करणे, लाइक करणे आणि कमेंट करणे अशी वैशिष्ट्ये प्रदान करते. Users त्यांच्या मित्र, कुटुंब, व्यवसाय किंवा इतर आवडत्या विषयावर आधारित नवीन खाती देखील शोधू शकतात.

Finding new content – इंस्टाग्राम Users ना त्यांच्या आवडीनुसार सामग्री शोधण्यात मदत करण्यासाठी विविध टूल्स प्रदान करते. आपण Hashtag, Location, Username वापरून आवश्यक ते सामग्री सर्च करू शकतात.

इंस्टाग्रामची इतर काही वैशिष्ट्ये –

  • Instagram Reels – रील्स हे 60 सेकंद पर्यंतचे लहान व्हिडिओ असतात जे तुम्ही मोबाईल वर तयार करून पोस्ट करू शकता.
  • Live Streaming – इंस्टाग्राम वरती लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याची सुविधाही देण्यात आलेली आहे.
  • IGTV – IGTV हे इंस्टाग्रामचे एका मिनिटापेक्षा मोठ्या व्हिडिओसाठी प्लॅटफॉर्म आहे.
  • Story – इतर सोशल मीडिया प्रमाणे इंस्टाग्राम वरती स्टोरी सुद्धा ठेवता येते जी 24 तासापर्यंतच असते.

निष्कर्ष –

Instagram हे एक लोकप्रिय Social Media Platform आहे जेथे लोक Photo, Video शेअर करत करतात. आज सामान्य व्यक्तीपासून ते मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण Instagram वापरतात. येथे तुम्ही फोटोसह, रील्स व्हिडिओ सहजपणे शेअर करू शकता. लक्षात ठेवा कि इंस्टाग्राम हे एक सोशल मीडिया आहे, याची सवय लागू शकते जी वाईट असते. त्यामुळे इंस्टाग्राम असो किंवा इतर सोशल मीडिया असतो ते मर्यादेत वापरावे.

मला आशा आहे कि तुम्हाला आमचा इंस्टाग्राम ची संपूर्ण माहिती मराठी हि पोस्ट नक्कीच आवडली असेल. कृपया ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेअर करून या ब्लॉगला प्रोत्साहन द्या. तुम्हाला काही अडचण असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता आणि आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद आणि अश्याच माहितीसाठी मराठी ऑनलाईन या वेबसाईट वरती पुन्हा येत राहा.

Leave a Comment