Keyboard Information in Marathi: संगणक हे मानवाच्या जीवनात बदल घडवून आणणारे एक Electronic Device आहे. हे अनेक उपकरणांचे मिळून बनले आहे, यात इनपुट उपकरण, आउटपुट उपकरण, हे सर्व आहेत. Computer Operate करण्यासाठी सर्व उपकरणांचा एकत्रित हातभार गरजेचा असतो.
कीबोर्ड ची संपूर्ण माहिती मराठी Keyboard Information in Marathi
सर्व उपकरणांच्या एकत्रित कार्याने संगणक योग्य रित्या कार्य करते. आपल्याला संगणक Operate करण्यासाठी दोन महत्त्वाच्या उपकरणांची गरज असते, माऊस आणि कीबोर्ड. मॉनिटर ची माहिती आपण या आधी घेतली आहे. आता आपण कीबोर्ड ची माहिती घेणार आहोत.
कीबोर्ड म्हणजे काय?
माऊस प्रमाणे कीबोर्ड हे एक संगणकाचे Input Device आहे. संगणकावर Commands, Text, Numerical Data, ई Enter करण्यासाठी कीबोर्ड चा उपयोग केला जातो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर User आणि Computer मध्ये संभाषण करण्यासाठी चे हे एक महत्त्वाचे Device आहे. हे एक हार्डवेअर उपकरण आहे.
संगणक सोबत खूप बटन असलेले उपकरण असते, त्याला कीबोर्ड म्हणतात. कीबोर्ड च्या बटन वर अक्षरे छापलेले असतात, आपण ज्या अक्षराचे बटन दाबतो ते अक्षर Computer वर टाईप होते. आपण बटन दाबल्यावर कीबोर्ड डेटा ला Machine Language मध्ये Convert करते, ज्यामुळे CPU या डेटा ला वाचू शकतो व पुढील प्रक्रिया करू शकतो.
कीबोर्ड ला खूप बटन असतात, प्रत्येक बटन CPU ला वेगळा डेटा पाठवते. कीबोर्ड चा सर्वात जास्त वापर टायपिंग करण्यासाठी केला जातो. सध्या बाजारात खूप प्रकारचे कीबोर्ड उपलब्ध आहेत. आता आपण कीबोर्ड म्हणजे काय हे समजून घेतले, पुढे कीबोर्ड चे प्रकार कोणते आहेत हे पाहुयात.
कीबोर्ड चा इतिहास
कीबोर्ड बनवण्याची युक्ती Type Writer मशीन पासून आली. टाईप रायटर मध्ये Typing करताना चूक होत असायच्या व बटन दाबायला पण अडचणी येत असत. यामुळे टाईप रायटर मध्ये बदल करणे गरजेचे होते, परंतू बदल न करता नवीन कीबोर्ड बनवण्यात आले.
1868 मध्ये क्रिस्टोफर लथम शोल्स (Christopher Latham Sholes) यांनी कीबोर्ड चा शोध लावला. क्रिस्टोफर लथम शोल्स हे एक अमेरिकन शाश्रज्ञ होते. यांनी शोध लावलेला कीबोर्ड QWERTY Layout चा होता. कालांतराने या लेआऊट मध्ये बदल करून विविध भाषेसाठी सोयीस्कर कीबोर्ड बनवण्यात आले.
कीबोर्ड चे प्रकार
कीबोर्ड कोणत्या देशात आणि कोणत्या भाषेसाठी वापरतात यावर कीबोर्ड चे काही प्रकार पडतात. लोकांच्या भाषे नुसार, सोयीनुसार अनेक Layout चे कीबोर्ड बनवण्यात आलेले आहेत. मी खाली काही लोकप्रिय कीबोर्ड च्या Layout ची माहिती दिली आहे.
1) QWERTY-
QWERTY हा जगात सर्वात जास्त वापरला जाणारा कीबोर्ड आहे. या कीबोर्ड मध्ये अक्षरांची सुरुवात Q, W, E, R, T, Y… अशी होते, त्यामुळे या कीबोर्ड ला QWERTY हे नाव दिले आहे. सर्वात पहिला QWERTY Keyboard 1868 मध्ये बनवला गेला, यामध्ये साधारणतः 101, 104 किंवा 107 बटन (Keyboard Keys) असतात. जगातील सर्वात जास्त पसंती मिळालेला कीबोर्ड म्हणून QWERTY कीबोर्ड ला ओळखले जाते.
2) QWERTZ-
QWERTZ हा कीबोर्ड पूर्णपणे QWERTY कीबोर्ड सारखाच आहे, फक्त फरक एकच आहे की, Y अक्षराच्या जागी Z हे अक्षर आहे. अक्षर बदलण्याचे कारण असे की, जर्मन भाषेत Z अक्षराचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होतो आणि German Orthography अनुसार T आणि Z ही अक्षरे एकमेकांच्या मागे- पुढे वापरले जातात. जर्मन लोक या कीबोर्ड चा वापर जास्त प्रमाणात करतात.
3) AZERTY-
AZERTY Layout हा QWERTY Layout चा French Version आहे. यामध्ये पहिल्या दोन अक्षरांच्या ऐवजी A आणि Z ही अक्षरे वापरली आहेत. हा एक लोकप्रिय European Keyboard Layout आहे आणि हा सर्वात जास्त फ्रांस मध्ये वापरला जातो.
4) QZERTY-
QZERTY Layout हा QWERTY Layout चा इटालियन Version आहे. यामध्ये W च्या जागी Z बदलला आहे. इटालियन भाषा वापरणारे लोक QZERTY कीबोर्ड चा उपयोग करतात. QZERTY कीबोर्ड चा सर्वाधिक वापर इटली मध्ये केला जातो.
कीबोर्ड कसे कार्य करते?
Computer Keyboard हे हार्डवेअर इनपुट डिव्हाइस आहे, म्हणजे याचे मुख्य कार्य संगणकाला इनपुट देण्याचे आहे. कीबोर्ड मध्ये Circuits, Switches, आणि Processors असतात. कीबोर्ड मध्ये स्वतःचा एक प्रोसेसर असतो, जो डेटा ला योग्य त्या रुपात Convert करून Computer च्या CPU कडे पाठवतो.
आता आपण कीबोर्ड चे कार्य कसे चालते हे समजून घेऊयात. समजा आपल्याला Computer Screen वर A हे अक्षर टाईप करायचे आहे. आपण कीबोर्ड मधील A चे बटन दाबले. Normal Condition मध्ये सर्व बटन Off असतात, जसे आपण A चे बटन दाबतो की लगेच A चा Switch ON होतो आणि त्याच क्षणात कीबोर्ड चे Circuit पूर्ण होते व त्यातून क्वचित करंट वाहतो. कीबोर्ड चे कोणते Switch ON झाले हे करंट द्वारे कीबोर्ड च्या प्रोसेसर ला समजते.
कीबोर्ड च्या Character Map मध्ये सर्व Switch चा Data स्टोर केलेला असतो. आपण A बटन Press केल्याची सूचना जशी कीबोर्ड च्या प्रोसेसर ला मिळते, त्याच क्षणात त्या Signal ला Computer CPU कडे पाठवते आणि मग CPU च्या मदतीने Monitor वर आपल्याला लगेच A अक्षर टाईप झालेले दिसते. ही प्रक्रिया खूप Fast असते. काही Milli-Seconds मध्ये आपल्याला आउटपुट मिळतो.
कीबोर्ड मध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान नुसार कीबोर्ड ते Computer CPU पर्यंत Data पाठवण्याचे माध्यम ठरते. कीबोर्ड मध्ये जर Bluetooth असेल तर Wireless म्हणजेच Radio Signal द्वारे डेटा पाठवला जातो आणि Wired असेल तर USB Cable च्या मदतीने Electrical Signal च्या रुपात डेटा Computer CPU कडे पाठवला जातो.
Keyboard Keys चे प्रकार
Keyboard या इनपुट डिव्हाइस मध्ये अनेक प्रकारचे बटन (Keyboard Keys) असतात. Keyboard Keys ला त्यांच्या उपयोगानुसार प्रकारांमध्ये विभाजित केलेले आहे. तर चला Keyboard keys च्या प्रकारावर नजर मारुयात.
1) Typing Keys-
Typing साठी वापरल्या जाणाऱ्या Keys म्हणजे Typing Keys. यात अक्षरे (Alphabet Keys) आणि संख्या (Numeric Keys) बटनांचा समावेश होतो. यांना Alphanumeric Keys असेही म्हणतात. कॉम्पुटर वर Typing करताना या सर्व बटन चा वापर होतो. Typing Keys मध्ये Punctuation आणि Symbols सुद्धा येतात.
2) Function Keys-
कीबोर्ड च्या सर्वात वरच्या लाईन मध्ये Function Keys असतात. F1, F2,… F12 ही सर्व Function Keys आहेत. Function key चे स्वतः चे वेगळे कार्य किंवा Function असते. सामान्य पणे डेस्कटॉप कॉम्पुटर च्या कीबोर्ड मध्ये 12 Keys असतात आणि Apple Keyboard मध्ये F1, F2,… F19 असे 19 Keys असतात.
3) Numeric Keys-
Numeric Keys चा उपयोग गणिते (Calculations) करण्यासाठी करतात. कीबोर्ड मध्ये 0, 1, 2,.. 9 ही Numeric Keys असतात. आपल्याला कोठे संख्या टाईप करायची असल्यास Numeric Keys वापरल्या जातात.
4) Control Keys-
Control Keys ह्या दुसऱ्या इतर Keys सोबत वापरल्या जातात. काही वेळेस यांचा Single पण वापर होतो. Ctrl, Alt, Escape, Windows, Pause, Break, prt sc, Shift, Page Up, Page Down ही Control Keys आहेत. Control Keys ला Navigation Keys असेही म्हणतात.
5) Indicators-
कीबोर्ड मध्ये सामान्यतः Numerical Key Indicator आणि Caps Lock Key Indicator असते. Numerical Key Indicator ON असले तरच संख्या टाईप होते. Caps Lock Key Indicator ON असेल तर सर्व अक्षरे Capital मध्ये टाईप होतात आणि OFF असेल तर Lowercase मध्ये टाईप होतात.
निष्कर्ष
मानवाच्या शरीराप्रणाने संगणकाच्या शरीराला अनेक अवयव असतात. आज आपण संगणकाच्या एका अवयवाची म्हणजे कीबोर्ड ची संपूर्ण माहिती घेतली.
मला आशा आहे की आपल्याला Keyboard Information in Marathi चांगल्या प्रकारे समजली असेल. तरीही आपल्याला काही अडचण असल्यास कंमेंट करून नक्की विचारा.
आजचा हा लेख आवडला असेल तर सोशल मीडियावर शेअर करून मित्रांना नक्की सांगा आणि संगणक बद्दल अधिक माहितीसाठी या ब्लॉगला सतत भेट देत राहा.