मायक्रो कॉम्प्युटर म्हणजे काय – इतिहास, प्रकार आणि फायदे, तोटे, संपूर्ण माहिती

Micro Computer Information in Marathi: नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण मायक्रो कॉम्प्युटर ची माहिती घेणार आहोत. या आधीच्या पोस्टमध्ये आपण संगणकाचे प्रकार पाहिले आहेत, त्यात मायक्रो कॉम्प्युटर चा उल्लेख आलेला आहे. मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप कॉम्प्युटर, टॅबलेट, हे मायक्रो कॉम्प्युटर च्या प्रकारात मोडतात.

मायक्रो कॉम्प्युटर ची माहिती Micro Computer Information in Marathi

आजच्या काळात सर्वात जास्त वापर मायक्रो कॉम्प्युटर चा होतो कारण ही हाताळायला सोपी आणि कमी किमतीत मिळतात. या लेखात आपण मायक्रो कॉम्प्युटर ची माहिती घेऊयात. मायक्रो कॉम्प्युटर चे ज्ञान असणे सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी आवश्यक ठरेल. तर चला मुख्य माहिती पाहुयात.

मायक्रो कॉम्प्युटर म्हणजे काय?

मायक्रो-कॉम्पुटर हे विद्युत शक्तीवर चालणारे संगणक असतात ज्यांमध्ये CPU च्या जागी मायक्रो-प्रोसेसर वापरले जातात. मायक्रो-कॉम्पुटर हे Mainframe आणि Minicomputer पेक्षा आकाराने छोटे व वजनाने हलके असतात. ही संगणक इतर संगणकप्रमाणे अनेक प्रकारची कार्ये करू शकतात फक्त ही वजनाने छोटी असतात.

मायक्रो-प्रोसेसर हे एक बहुउद्देशीय आणि प्रोग्रॅम करण्यायोग्य लॉजिक डिव्हाइस आहे जे स्टोरेज डिव्हाइस वरून बायनरी सूचना वाचते आणि त्या सूचनांवर प्रक्रिया करून आउटपुट प्रदान करते.
एकटा माणूस अगदी सहजपणे मायक्रो कॉम्पुटर चालवू शकतो कारण याची डिजाईन एका व्यक्तीला चालवता यावी अशीच केलेली आहे.

मायक्रो कॉम्पुटर हा शब्द 1970-1980 च्या दशकात वापरला जात होता आता तो इतका वापरला जात नाही. मायक्रो कॉम्पुटर ला आज वैयक्तिक संगणक (Personal Computer), PC किंवा डेस्कटॉप हे शब्द वापरले जातात. मायक्रो कॉम्प्युटर्स आज सर्वात जास्त प्रमाणात वापरले जातात.

उदाहरणे – पर्सनल कॉम्पुटर, मोबाईल, लॅपटॉप, Calculator, ई.

मायक्रो कॉम्प्युटर चा इतिहास

मायक्रो कॉम्पुटर ला तयार करण्यासाठी छोट्या आकाराच्या प्रोसेसर ची गरज असते, 1970 च्या आधी छोट्या आकाराचे प्रोसेसर अस्तित्वात नव्हते. 1971 मध्ये Intel 4004 प्रोसेसर चे आगमन झाले आणि यानंतर काही वर्षात Intel 8008 आणि Intel 8080 प्रोसेसर चा निर्माण झाला आणि Micro Computer चा एक नवा मार्ग तयार झाला.

जगातील पहिल्या Micro Computer चे नाव माइक्रल (Micral) आहे ज्याला 1973 मध्ये R2E (Réalisation d’Études Électroniques) द्वारे जारी केले गेले होते. Micral मध्ये Intel 8008 Microprocessor वापरण्यात आलेले होते. हा Intel 8008 प्रोसेसर वर आधारित पहिला Non-Kit कॉम्पुटर होता.

अल्टेयर 8800 हा पहिला यशस्वी व्यावसायिक Micro Computer आहे. अल्टेयर 8800 हा Intel 8080 प्रोसेसर वर आधारित संगणक होता. याला 1974 मध्ये इंस्ट्रुमेंटेशन टेलीमेट्री सिस्टम्स (MITS) द्वारे डिजाईन करण्यात आले होते.

कालांतराने प्रोसेसर चा आकार लहान होत गेला, तसे Micro Computer मध्ये बदल होत गेले. आताच्या काळातील Micro Computer हे अतिशय वेगवान आहेत म्हणजे यांची प्रोसेसिंग क्षमता खूप जास्त आहे. सोबतच साठवण क्षमता आणि डेटा हँडलिंग क्षमतेतही खूप वाढ झालेली आहे.

मायक्रो कॉम्पुटर चे प्रकार

मायक्रो कॉम्प्युटर चे प्रकार खालीलप्रमाणे आहेत –

  • Desktop
  • Laptop
  • Notebook
  • Smartphone
  • Tablet
  • Workstation
  • PDA
  • Server

मायक्रो कॉम्पुटर चे कॉम्पोनन्ट्स

कॉम्पुटर चे भाग म्हणजेच कॉम्पोनन्ट्स असे आपण म्हणू शकतो. विविध प्रकारचे मायक्रो कॉम्प्युटर उपलब्ध आहेत, परंतु प्रत्येक मायक्रो कॉम्प्युटरमध्ये हे मूलभूत घटक असतातच –

  1. Micro-Processor
  2. Memory Unit
  3. Input Unit
  4. Output Unit

1) Micro-Processor

Micro-Processor हा कॉम्पुटर चा मुख्य भाग मानला जातो कारण कॉम्पुटरमध्ये होणाऱ्या सर्व प्रक्रिया Micro-Processor नियंत्रित करत असते. Micro-Processor ला आपण सिपीयू, किंवा प्रोसेसर असेही म्हणू शकतो. संगणकात होणाऱ्या सर्व प्रक्रिया मायक्रो प्रोसेसर कंट्रोल करत असते.

2) Memory Unit

मेमरी युनिट FIFO, LIFO, OPR, LRU इत्यादी अनेक मेमरी व्यवस्थापन तंत्रांचा वापर करून मेमरीमधील Inflow आणि Outflow नियंत्रित करते. कॉम्पुटर मध्ये दोन प्रकारच्या मेमरी असतात.

पहिली म्हणजे Volatile मेमरी, ही मेमरी जोपर्यंत संगणक चालू आहे म्हणजे Current Supply होत आहे तोपर्यंत डेटा स्टोर करते. Non-Volatile मेमरी डेटाला स्थायी स्वरूपात स्टोर करते. विजेचा प्रवाह बंद झाला तरीही यातील डेटा हटवला जात नाही.

ROM (Read Only Memory) हे Non-Volatile Memory चे उदाहरण आहे. तर RAM (Random Access Memory) हे Volatile Memory चे उदाहरण आहे.

3) Input Unit

Input Unit मध्ये असे भाग येतात ज्यांच्या मदतीने यूजर संगणकाला इनपुट देतो. यूजर ने दिलेल्या इनपुट वर संगणक प्रक्रिया करून आउटपुट प्रदान करते. जेव्हा आपल्याला संगणकाला काही इनपुट द्यायचे असेल तेव्हा आपण इनपुट उपकरण वापरतो. माऊस आणि कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस ची उदाहरणे आहेत.

4) Output Unit

Output Unit मध्ये असे भाग येतात ज्यांच्या मदतीने संगणक यूजर ला Output प्रदान करते. यामध्ये मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर ही उपकरणे येतात. यांच्या मदतीने संगणक यूजर ला आउटपुट प्रदान करते.

मायक्रो कॉम्पुटर चे फायदे

सुरुवातीला संगणकाचा आकार खूप मोठा होता त्यामुळे सर्वसामान्य लोकांना संगणक वापरणे शक्य नव्हते. कालांतराने नवीन नवीन तंत्रज्ञान आले व संगणकाचा आकार लहान झाला. लहान संगणकाना आपण Micro-Computer असे म्हणतो. तर चला मायक्रो संगणकाचे फायदे काय होतात हे पाहुयात.

1) Cost

मायक्रो कॉम्पुटर चा हा एक मोठा फायदा आहे. मायक्रो कॉम्पुटर कमी पैशात बाजारात उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला जास्त खर्च करायची गरज नाही.

2) Maintenance

Micro-Computer चा Maintenance खर्च कमी आहे. यातील कोणताही भाग जसा कोणता हार्डवेअर भाग खराब झाला तर त्याला सहजपणे बदलता येते.

3) Size

संगणकाचा आकार कमी झाला त्यामुळे मायक्रो कॉम्प्युटर असे नाव देण्यात आले. आकार कमी असल्याने हे संगणक हाताळायला सोपे आणि पोर्टबल आहेत.

4) Portability

पोर्टेबिलिटी म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येणे. आकार लहान असल्याने मायक्रो कॉम्पुटर सहजपणे आपण कुठेही नेऊ शकतो.

5) Flexibility

मायक्रो कॉम्प्युटर मल्टीटास्किंग सुविधा प्रदान करतात. उदाहरणार्थ इंटरनेटवर सर्फिंग, टिकट बुकिंग, मूव्ही पाहणे आणि गेम खेळणे ई.

मायक्रो कॉम्पुटर चे तोटे

मायक्रो कॉम्पुटर चे जसे फायदे आहेत तसे काही तोटे सुद्धाही आहेत. मायक्रो कॉम्पुटर चे तोटे खालीलप्रमाणे –

1) Performance

मायक्रो कॉम्प्युटर चा परफॉर्मन्स सुपर कॉम्प्युटर आणि मेनफ्रेम कॉम्प्युटरचच्या तुलनेत कमी आहे. यामध्ये आपण खूप मोठ्या गेम खेळू शकत नाहीत किंवा High End App चालवू शकत नाहीत.

2) Security

सुपर कॉम्प्युटर किंवा मेनफ्रेम कॉम्पुटर च्या तुलनेत मायक्रो कॉम्पुटर ची Security जरा कमकुवत आहे. यामध्ये डेटा हॅक होण्याची शक्यता थोडी जास्त असते, त्यामुळे हाताळताना सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे लागते.

3) Storage Capacity

जर आपण मायक्रो कॉम्पुटर ची तुलना सुपर कॉम्प्युटर आणि मेनफ्रेम कॉम्पुटर सोबत केली तर असे पाहायला मिळते की स्टोरेज क्षमतेच्या तुलनेत मायक्रो कॉम्प्युटर माघे आहेत. त्यामुळे हा मायक्रो कॉम्पुटर चा एक तोटा म्हणता येईल.

4) Addiction

मायक्रो कॉम्प्युटरमध्ये मनोरंजनाचे पर्याय (जसे संगणक गेम, इंटरनेट ब्राउजिंग आणि सोशल नेटवर्किंग साइट्स) हे लोकांना व्यसनी बनवतात. घरात मायक्रो कॉम्पुटर असल्याने लहान मुलांना यावर गेम्स खेळण्याची सवय लागू शकते, त्यामुळे पालकांनी यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

5) Health Concern

मायक्रो कॉम्प्युटरचा दीर्घकाळ वापर केल्याने पाठदुखी, मानदुखी, खांदेदुखी, डोकेदुखी यासारख्या विविध शारीरिक समस्या उद्भवू शकतात आणि नेहमी खुर्चीवर बसून शारीरिक हालचालींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेकदा लठ्ठपणा देखील होऊ शकतो. तसेच, बहुतेक वापरकर्त्यांना सतत संगणकाच्या स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्याचे आजार पण होतात.

निष्कर्ष

आजच्या पोस्टमध्ये आपण Micro Computer Information in Marathi पाहिली आहे. यामध्ये आपण मायक्रो कॉम्पुटर म्हणजे काय, याचा इतिहास, याचे भाग, फायदे आणि तोटे याबद्दल माहिती घेतली आहे.

आकार लहान झाल्याने संगणकाचा वापर विविध क्षेत्रात वाढत गेला. सुपर कॉम्पुटर, मेनफ्रेम कॉम्पुटर हे सर्वसामान्य लोकांना हाताळता येणे शक्य नव्हते, परंतु लहान असलेल्या मायक्रो कॉम्पुटर ने हे शक्य केले. आता सर्वात जास्त प्रमाणात ही कॉम्प्युटर वापरले जातात.

आपल्याला आजची पोस्ट कशी वाटली कंमेंटमध्ये नक्की सांगा. मायक्रो कॉम्पुटर संबंधित काहीही शंका असेल तर कंमेंट मध्ये नक्की विचारा आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment