Parts of Computer in Marathi: संगणक हे एक उपकरण नसून अनेक उपकरणांना एकत्रित जोडण्यात आलेले आहे, हे तुम्हाला सर्वांना माहितच असेल. संगणकाच्या या पार्ट चे दोन मुख्य प्रकार आहेत, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. संगणकाच्या ज्या भागांना आपण स्पर्श करू शकतो त्यांना हार्डवेअर असे म्हणतात आणि आपण ज्यांना स्पर्श करू शकत नाहीत त्यांना सॉफ्टवेअर असे म्हणतात.
संगणकाच्या प्रत्येक पार्टचे कार्य वेगळे असते. जसे संगणकाला इनपुट देणे, यूजरला आउटपुट दर्शवणे, स्टोरेज डिव्हाइस मध्ये माहिती साठवणे आणि माहितीवर प्रक्रिया करणे. संगणकाच्या प्रत्येक भागात या पैकी एक कार्य करण्याची क्षमता असते.
संगणकाचे सर्व पार्टस ऑपरेटिंग सिस्टिम द्वारे एकमेकांना जोडलेले असतात आणि ऑपरेटिंग सिस्टिम द्वारेच नियंत्रित केले जातात. तर आज या पोस्टमध्ये आपण संगणकाच्या महत्वाच्या भागांची माहिती Information About Parts of Computer in Marathi घेणार आहोत.
Parts of Computer in Marathi: संगणकाचे भाग व माहिती, मराठी मध्ये
संगणकाच्या प्रत्येक भागाचे कार्य वेगळे असते, त्या कार्यानुसार संगणकाच्या भागाचे विभाजन केले गेले आहे.
- अ) इनपुट डिवाईस
- ब) आउटपुट डिवाईस
- क) स्टोरेज डिवाईस
- ड) प्रोसेसिंग डिवाईस
संगणक कोणतेही असो, डेस्कटॉप, स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, ई. वरील चार संगणकाचे प्रकार प्रत्येकी एक पार्ट तरी त्यात असतातच. तर चला आता संगणकाच्या भागांची विस्तारित माहिती घेऊयात.
अ) इनपुट डिवाईस –
आपण संगणकाची माहिती या पोस्टमध्ये पाहिले की संगणक यूजर ने दिलेल्या इनपुट च्या आधारावर कार्य करते. संगणकाला इनपुट देण्यासाठी काही साधने असतात त्यांना इनपुट डिवाइस किंवा इनपुट साधने म्हणतात.
ज्याप्रमाणे आपण माउसचा उपयोग करून कोणतेही डेस्कटॉप संगणक चालवू शकतो म्हणजे माउस संगणकाला इनपुट देते, माउस हे इनपुट डिवाइस आहे.
इनपुट डिवाइसला इंस्टॉल करण्यासाठी संगणकामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात. प्रत्येक इनपुट डिवाइससाठी वेगळे सॉफ्टवेअर असते. तर आता आपण संगणकातील महत्वाच्या इनपुट डिवाइसची माहिती घेऊयात.
1) माउस –
डेस्कटॉप संगणकाच्या स्क्रीनमध्ये एक तिरका बाण असतो त्याला कर्सर असे म्हणतात. या कर्सर ची हालचाल माउसच्या साहाय्याने होते. जसे आपण माउस फिरवतो तसे स्क्रीन वरील कर्सर फिरतो.
माउसच्या साहाय्याने आपण फोल्डर Open, Delete, Copy-Paste करू शकतो. माउसला दोन बटन असतात-
- 1) Right Click
- 2) Left Click
आणि दोन्ही बटन च्या मध्ये एक फिरकी असते. यांचा वापर करून माउस द्वारे संगणक चालवले जाते.
2) कीबोर्ड –
कीबोर्डचा वापर संगणकावर लिखाण काम करण्यासाठी केला जातो. डेस्कटॉप संगणक व लॅपटॉप च्या एका भागात खूप बटणे असतात, त्याला कीबोर्ड असे म्हणतात.
कीबोर्डला १०० पेक्षा जास्त बटन असतात. त्यांना Keyboard Keys असे म्हणतात. कीबोर्ड मध्ये Function Keys, Typing Keys, Control Keys, Navigation Keys आणि Numeric Keys असतात.
3) टच स्क्रीन –
स्मार्टफोन आणि टॅबलेट मध्ये टच स्क्रीन चा वापर केला जातो. आपल्या बोटाने स्क्रीनवर क्लिक करून यांना नियंत्रित केले जाते.
माउस व कीबोर्ड दोन्हींचे कार्य टच स्क्रीन करते. स्मार्टफोन आणि टॅबलेट सोबतच आता काही लॅपटॉप मध्येही टच स्क्रीन चा वापर केला गेला आहे. टच स्क्रीन वापरल्याने कार्य लवकर पूर्ण होतात हा एक मोठा फायदा आहे.
4) मायक्रो फोन –
संगणकाला ऑडिओ च्या स्वरूपात इनपुट देण्यासाठी मायक्रो फोन चा वापर केला जातो. मायक्रो फोन च्या मदतीने आपण Voice Chat, Voice Calling द्वारे मित्रांशी बोलू शकतो. तसेच गाणे रेकॉर्ड करण्यासाठी मायक्रो फोन वापरला जातो.
स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉप मध्ये मायक्रो फोन आधीच कंपनी द्वारे दिलेले असतात. (Parts of Computer in Marathi) डेस्कटॉप संगणकासाठी मायक्रो फोन वेगळे विकत घ्यावे लागतात.
5) वेब कॅमेरा –
वेब कॅमेराचा उपयोग विडिओ बनवण्यासाठी केला जातो. डेस्कटॉप संगणकाला वेब कॅमेरा विकत घ्यावा लागतो. लॅपटॉप, स्मार्टफोन आणि टॅबलेट ला In-Built कॅमेरा असतो, याला सेल्फी कॅमेरा या नावाने सुद्धा ओळखले जाते. वेब कॅमेरा एक वायर द्वारे संगणकाला जोडलेला असते.
Video Calling, Video Recording आणि फोटो काढण्यासाठी वेब कॅमेरा चा वापर केला जातो. डेस्कटॉप संगणकाचा वेब कॅमेरा आकाराने मोठा असतो. (Parts of Computer in Marathi) आपल्या आवश्यकतेनुसार आपण क्वालिटी निवडू शकतो
ब) आउटपुट डिवाईस –
संगणकाने प्रक्रिया केलेल्या डेटाला यूजर पर्यंत पोहोचवण्याचे कार्य Output Devices चे असते. संगणकाला इनपुट डिवाईस द्वारे डेटा मिळतो आणि तो डेटा प्रक्रियेनंतर यूजरला आउटपुट उपकरण द्वारे दर्शवला जातो. डेस्कटॉप संगणकात मॉनिटर हे एक आउटपुट उपकरण आहे.
आपण जी प्रक्रिया करतो ती सर्व आपल्याला स्क्रीनवर दिसते, त्यामुळे मॉनिटर हे डेस्कटॉप संगणकाचे एक महत्त्वाचे आउटपुट उपकरण आहे. आता आपण काही महत्वाच्या आउटपुट Parts ची माहिती घेऊयात.
1) मॉनिटर –
डेस्कटॉप संगणकाला TV सारखी स्क्रीन असते, त्या उपकरणाला मॉनिटर असे म्हणतात. संगणकावर करत असलेले सर्व कार्ये यावर दर्शवले जातात. मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप, मध्येही स्क्रीनचा वापर आउटपुट उपकरण म्हणून केला जातो.
मॉनिटरला Visual Display Unit असे म्हटले जाते. मॉनिटर हा डेस्कटॉप संगणकाचे सर्वात महत्वाचे आउटपुट उपकरण आहे. हे आउटपुट ला Soft Copy च्या स्वरूपात दर्शवते.
2) प्रिंटर –
संगणक द्वारे मिळालेल्या आउटपुट डेटाचे Hard Copy च्या स्वरूपात रूपांतर करण्यासाठी प्रिंटर वापरले जाते. प्रिंटर वापरून आपण कोणतेही Document, Photo ना कागदावर प्रिंट करू शकतो. प्रिंटर चे बरेच प्रकार सुद्धा असतात.
प्रिंटर वापरून कोणत्याही आकाराच्या कागदावर प्रिंटिंग करता येते, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंटर वापरले जातात. काही प्रिंटरमध्ये शाही वापरली जाते तर काही मध्ये लेजर द्वारे प्रिंट रेखाटले जाते. आता तर नवीन 3D प्रिंटर आले आहेत, याद्वारे तर हुबेहूब पूर्ण त्रिमितीय वस्तू प्रिंट करता येते.
3) प्रोजेक्टर –
विडिओ ला मोठ्या पडद्यावर दर्शवण्याचे कार्य प्रोजेक्टर चे असते. थिएटर मध्ये जसे वस्तू द्वारे लाईट पडद्यावर सोडली जाते आणि मग तुम्ही सिनेमा पाहता. त्या लाईट सोडण्याच्या यंत्राला प्रोजेक्टर म्हटले जाते.
प्रोजेक्टरचा उपयोग नुसता थेटर मधेच नाही तर, शाळा, कॉलेज मध्येही केला जातोय. ऑफिस मध्ये प्रेझेन्टेशन दाखवण्यासाठी प्रोजेक्टर वापरले जाते. प्रोजेक्टर ची किंमत जरा जास्त असते पण मोठी स्क्रीन वापरल्याऐवजी प्रोजेक्टर परवडतात.
4) स्पीकर –
संगणक द्वारे ऑडिओ आउट पुट मिळवण्यासाठी स्पीकर वापरले जातात. आपण वापरणाऱ्या स्मार्टफोन मध्ये ज्या ठिकानातून आवाज बाहेर येतो तेथे स्पीकर बसवलेले असतात.
स्पीकर वापरून आपण गाणे ऐकू शकतो, कोणत्याही प्रकारचा ऑडिओ ऐकू शकतो. डेस्कटॉप संगणकाला स्पीकर स्वतंत्रपणे विकत घ्यावे लागतात. स्मार्टफोन, टॅबलेट, आणि लॅपटॉपच्या आतमध्ये कंपनीने कडून स्पीकर बसवलेले असतात.
5) प्लॉटर –
संगणकात बनवलेल्या मोठ्या आकाराच्या आकृत्या किंवा डिजाईन कागदावर हुबेहूब रेखाटण्यासाठी प्लॉटर वापरले जातात. प्लॉटर यांना बनवण्यासाठी पेनाचा वापर करते किंवा लेदर कापण्यासाठी कात्रीचा वापर करतात. लेदरच्या कापडाला कापून आकार देणाऱ्या प्लॉटर ला Cutting Plotter म्हटले जाते.
पूर्वी प्लॉटरचा वापर संगणकीय आकृत्या काढण्यासाठीच केला जायचा, कारण साध्या प्रिंटर पेक्षा प्लॉटर चा वेग जास्त असतो आणि प्रिंटर लहान होते. परंतु, आता प्लॉटर ची जागा प्रिंटरने घेतली आहे. तरीही काही कंपन्यांमध्ये आजही प्लॉटर वापरले जाते.
क) स्टोरेज डिवाईस –
संगणकातील सर्व डेटा स्टोरेज डिवाईस मध्ये साठवला जातो. सोप्या भाषेत स्टोरेज डिवाईसला मेमरी असे संबोधले जाते. Hard Drive हे डेस्कटॉप संगणकाचे मुख्य स्टोरेज डिवाईस आहे. संगणकाची Operating System, Applications, Software आणि फाईल्स हे सर्व हार्ड डिस्क मध्ये जतन केलेले असतात.
स्टोरेज डिवाईस चे दोन मुख्य प्रकार असतात, प्राथमिक आणि माध्यमिक स्टोरेज डिवाईस. आता आपण काही सामान्य वापरात असलेल्या स्टोरेज डिवाईस ची माहिती घेऊयात.
1) हार्ड डिस्क –
हार्ड डिस्क ला Hard Disk Drive (HDD) असे सुद्धा म्हटले जाते. हे एक प्रकारचे मेमरी हार्डवेअर डिवाईस आहे. याचे कार्य संगणकीय डेटाला कायमस्वरूपी (Permanently) साठवून ठेवण्याचे आहे.
हार्ड डिस्क हे Non-Volatile प्रकारचे मेमरी डिवाईस आहे, म्हणजे हे डेटाला स्थायी स्वरूपात संग्रहित (Permanently Store) करते. हार्ड डिस्क संगणकाच्या CPU बॉक्समध्ये डेटा लेबल द्वारे जोडलेली असते.
2) फ्लोपी डिस्क –
फ्लोपी डिस्कचा वापर पूर्वी केला जायचा, आता यांचा वापर खूप कमी आहे. ही डिस्क प्लास्टिक पासून बनवलेल्या होत्या आणि यांच्यात थोडा लवचिकता असे.
फ्लोपी डिस्कमध्ये डेटा एक गोलाकार चुंबकीय प्लेटमध्ये साठवला जातो आणि तेथूनच मिळवला पण जातो. फ्लोपी डिस्कला Floppies आणि Diskettes असे इतर नावे आहेत.
3) मेमरी कार्ड –
मेमरी कार्ड चे कार्य बाकी स्टोरेज डिवाईस सारखेच आहे, फरक एवढाच आहे की मेमरी कार्डचा आकार एक लहान कार्डसारखा असतो. इतका लहान की आपल्या अंगठ्याच्या नखाएवढा !
मेमरी कार्ड चा जास्त वापर मोबाईल फोन मध्ये केला जातो, कारण छोट्या आकारामुळे मोबाईल मध्ये जोडणे शक्य होते. इतर स्टोरेज डिवाईस च्या तुलनेत मेमरी कार्ड स्वस्त असतात.
4) CD आणि DVD –
ही Read Only Memory या प्रकारातील मेमरी डिवाईस आहे, कारण CD आणि DVD यांच्यातील डेटा फक्त पाहता येतो, त्यात बदल करता येत नाही. CD ची साईझ 700 Mb असते. पूर्वी सिनेमा पाहण्यासाठी बाजारात DVD मिळायची.
लग्न, समारंभात विडिओ रेकॉर्डिंग DVD मध्ये केल्या जायच्या. आता यांचा वापर कमी झाला आहे. पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड हे DVD च्या ऐवजी वापरले जात आहेत.
ड) प्रोसेसिंग डिवाईस –
प्रोसेसिंग डिवाईस हा संगणकाचा एक भाग आहे, ज्याचा वापर करून संगणक यूजर ने दिलेल्या इनपुट नुसार प्रक्रिया करते. सर्व प्रोसेसिंग डिवाईस हे हार्डवेअर Parts of Computer असतात.
प्रोसेसिंग डिवाईस चे कार्य असते की, यूजर संगणकाला जो इनपुट देतो त्यानुसारप्रक्रिया करणे. सर्व प्रकारचे Processor, Graphics Card, Sound Card, Mother Board, ई प्रोसेसिंग डिवाईस आहेत. तर आता याबद्दल थोडी माहिती घेऊ.
1) मदरबोर्ड –
मदरबोर्ड हे प्रिंट केलेले डिजिटल सर्किट बोर्ड आहे. याला संगणकाचा पाया म्हटले जाते कारण संगणकाचे सर्व पार्ट मदरबोर्ड द्वारे एकमेकांना जोडलेले असतात. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर पार्ट्स मदरबोर्ड द्वारे एकमेकांना जोडलेले असतात.
संगणकात अनेक लहान- मोठी सर्किट बोर्ड असतात, त्यात हे सर्वात मोठे असते. संगणकाचे मुख्य पार्ट जसे Memory, Transistor, Monitor, Mouse हे मदरबोर्डला जोडलेले असतात
2) मायक्रो प्रोसेसर –
मायक्रो प्रोसेसर हे एक डिजिटल इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. मायक्रो प्रोसेसर मध्ये लाखो Transistor एकमेकांना जोडलेले असतात. हा संगणकाचा गाभा असतो. संगणकाची सर्व कार्य मायक्रोप्रोसेसर नियंत्रित करते.
संगणक दिलेले कार्य करण्यास किती वेळ लावते, हे त्याच्या मायक्रो प्रोसेसरच्या रचनेवर आधारित असते. जगातील सर्वात शक्तिशाली असलेले महासंगणक मध्ये लाखोंच्या संख्येत मायक्रो प्रोसेसर असतात.
3) रॅम –
RAM म्हणजे Random Access Memory ही एक प्रकारची मेमरी आहे. रॅमची प्रोसेसिंग प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असते. संगणक प्रक्रिया करत असलेला डेटा रॅममध्ये साठविला जातो आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तो डेटा यूजर ला आउटपुट च्या स्वरूपात दिला जातो.
पुढे डेटा जर युजरला साठवून ठेवायचं असेल तर तो डेटा ROM मध्ये साठवला जातो. येथे रॅम चे कार्य संपते. संगणकाची रॅम जास्त, म्हणजे संगणकाचा कार्य करण्याचा वेग जास्त.
4) ग्राफिक्स कार्ड –
हा संगणकाचा एक पार्ट आहे, जो मॉनिटर स्क्रीन वर दृश्य तयार करतो. ग्राफिक्स कार्ड ची गुणवत्ता चांगली तरच स्क्रीन वरील दृश्य चांगली येतात. संगणकावर गेम खेळण्यासाठी व व्हिडिओ पाहण्यासाठी Graphics Card ची गरज असते.
ग्राफिक्स कार्ड ने स्क्रीनची गुणवत्ता सुधारते. मोबाईल आणि टॅबलेट मध्ये Graphics Card टाकायची गरज नसते, यात System मध्ये ग्राफिक्स इंस्टॉल केलेले असतात.
5) साउंड कार्ड –
साउंड कार्ड हे ऑडिओ इनपुट डिवाइस आहे. संगणकामध्ये आवाज तयार करण्यासाठी साउंड कार्ड वापरले जातात आणि हा आवाज आपल्याला स्पीकर व हेडफोन द्वारे ऐकू येतो.
ग्राफिक कार्डप्रमाणे हे कार्ड संगणकाला स्वतंत्र जोडायचे नसते. संगणक घेतल्यावर ते मदर बोर्ड मध्ये आधीच दिलेले असते.
निष्कर्ष
संगणकाचे Parts व माहिती (Parts of Computer in Marathi), आता मी तुम्हाला दिलेली आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला सर्व माहिती चांगल्याप्रकारे समजली असेल.
आपणास जर काही अडचण असेल तर कंमेंट द्वारे विचारायला विसरू नका आणि या विषयावर अधिक माहितीसाठी ब्लॉगला वारंवार भेट देत राहा.
आपणास संगणकाचे भाग व माहिती- Parts of Computer in Marathi हा लेख कसा वाटला, मला कंमेंट द्वारे नक्की कळवा.