आपण शाळा, कॉलेज मध्ये असाल किंवा एखाद्या कंपनीत कामाला असाल, तेथे तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायची गरज कधी ना कधी लागतेच. हे PPT प्रेझेंटेशन म्हणजे खूप डोकेदुखी चे काम असते. हे बनवण्यासाठी संशोधन करावे लागते, डिझाईन बनवावी लागते, माहिती टाकावी लागते आणि शेवटी सगळे एकत्र करून PPT मध्ये टाकावे लागते. या कामाला तासनतास वेळ खर्च होतो. पण जर मी असे म्हणले तर की हे काम आता 5 मिनिटांत होणार!
होय! आज आपण माहिती घेणार आहोत एका AI Tool ची ज्याचे नाव Tome AI. एक असे टूल जे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कोणतेही PPT Presentation काही मिनिटांत बनवण्याची क्षमता ठेवते. कोणत्याही विषयावर PPT बनवून देते ते सुद्धा कमी वेळेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण Tome AI बद्दल माहिती घेऊयात आणि हे कसे वापरायचे हे सुद्धा पाहुयात. तर चला पाहुयात हे नेमकी आहे काय?
Tome AI – काय आहे हे टॉम AI?
Tome AI हे एक आधुनिक AI आधारित प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला काही क्षणात कोणत्याही विषयावर प्रेझेंटेशन बनवून देण्याची क्षमता ठेवते. यामधे Generative AI ची वापर करण्यात आलेला आहे ज्यामुळे हे काही वेळातच प्रेझेंटेशन बनवू शकते. Tome AI चा वापर करून प्रेझेंटेशन बनवण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा विषय आणि महत्वाचे मुद्दे टाकायचे आहेत.
AI टूलचे नाव – | Tome AI |
वेबसाईट – | https://tome.app/ |
कंपनीचे नाव – | Magical Tome |
लाँच – | 2020 |
टूलची श्रेणी – | प्रेझेंटेशन (PPT) जनरेटर |
Tome AI टूल तुम्हाला डिझाईन, लेआऊट, माहिती सर्व बनवून देईन. तुम्हाला जर तुमची काही फोटो जोडायची असतील तर त्याची सुविधा सुधा देण्यात आलेली आहे. आता तुम्हाला PPT बनवण्यासाठी तासनतास मेहनत घेण्याची गरज नाही Tome AI वापरून काही क्षणात PPT तुम्ही PPT, PDF बनवू शकता.
Tome AI फ्री आहे का पेड?
Tome AI हे टूल फ्री सुद्धा आहे आणि पेड सुद्धा! हे टूल तीन प्रकारच्या प्लॅन मध्ये येते. ते खाली पाहुयात.
१) Free – हा प्लॅन सर्वांसाठी मोफत आहे परंतु यामध्ये फक्त ५०० क्रेडिट येतात ते संपेपर्यंत तुम्ही वापरू शकता. फ्री प्लॅनमध्ये थोडेच फिचर देण्यात आलेले आहेत आणि हा प्लॅन तुम्ही जास्त दिवस चालवू नाही शकत कारण क्रेडिट संपल्यावर तुम्हाला फ्री मध्ये वापरता येणार नाही.
२) Pro – प्रो प्लॅन घेण्यासाठी तुम्हाला महिन्याला १६$ पेमेंट करावे लागेल. या प्लॅनमध्ये Unlimited PPT बनवू शकता, तेही आधीपेक्षा फास्ट स्पीड ने. सोबतच यामध्ये Custom Branding, Engagement Analysis आणि Export to PDF असे पर्याय सुद्धा आहेत.
३) Enterprise – हा प्लॅन संस्था किंवा कंपन्यांसाठी आहे. तो खरेदी करण्यासाठी, तुम्हाला Tome AI च्या कस्टमर केअर शी संपर्क करावा लागेल आणि तुम्ही त्यांच्याशी संपर्क करूनच हा प्लॅन खरेदी करू शकता. यामध्ये अधिक Advanced फीचर्स आहेत.
Tome AI कसे वापरावे?
Tome AI च्या मदतीने तुम्ही कोणत्याही विषयावर प्रेझेंटेशन बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला हे Tome AI वापरायला यायला हवे. हे वापरण्यासाठी खालील माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल. Tome AI वापरायला सुरु करायची पहिली स्टेप आहे त्यात लॉगिन किंवा Sign Up करणे. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
Login/ Sign Up करा
Tome AI चा वापर करण्यासाठी सर्वात आधी https://tome.app/ या वेबसाईट वरती जायचे आहे. वेबसाईट ओपन झाल्यावर Try Tome या बटन वरती क्लिक करावे.
आता पुढे तुमच्यासमोर लॉगिन करण्याचा फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुमचा ई-मेल टाकावा किंवा गूगल अकाउंट च्या मदतीने थेट लॉगिन करू शकता.
Presentation चा विषय टाका
आता या स्टेप मध्ये आपल्याला कोणत्या विषयावर प्रेझेंटेशन बनवून पाहिजे त्याचा विषय टाकायचा आहे. यासाठी Tome AI च्या डॅशबोर्ड वरती दिलेल्या Generate with AI या पर्यायावर क्लिक करावे.
त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला विषय टाकायचा आहे. प्रेझेंटेशन चा विषय टाकल्यावर Generate Outline वरती क्लिक करावे. यावर क्लिक केल्यावर तुमचे प्रेझेंटेशन बनवायला सुरुवात होईल.
AI ला काम करू द्या
Artificial Intelligence चे काम आता सुरू झाले आहे, म्हणजे तुम्ही टाकलेल्या विषयावर प्रेझेंटेशन बनवण्यासाठी सुरुवात झाली आहे.
हे टूल AI च्या साहाय्याने तुम्हाला स्लाईड बनवून देईल यासाठी थोडा वेळ लागू शकतो. स्लाईड बनवून झाल्यावर तुम्हाला दाखवल्या जातील.
Presentation पाहा आणि Edit करा
AI च्या मदतीने तयार झालेले प्रेझेंटेशन तुमच्यासमोर ओपन केले जाईल. आता तुम्ही ते एकदा तपासायचे आहे आणि तुम्हाला वाटेल त्यानुसार त्यामध्ये बदल करू शकता.
आवश्यक असेल तर त्यात तुम्ही माहिती, फोटो आणि इतर घटक जोडू शकता. अश्या प्रकारे तुम्ही Tome AI वापरायला सुरू करू शकता.
Tome AI ची महत्वाची वैशिष्ट्ये
Tome AI हे एक आधुनिक AI आधारित टूल आहे जे तुम्हाला प्रेझेंटेशन बनवून देते. याची अनेक वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे हे कमी वेळेत आणि ऑटोमॅटिक पद्धतीने PPT बनवते. ते चला Tome AI ची वैशिष्ट्ये पाहुयात.
- Tome AI चे सर्वात महत्वाचे वैशिष्टय म्हणजे याची Automatic Presentations बनवण्याची क्षमता. आपण याला फक्त विषय द्यायचा आहे हे आपल्याला प्रेझेंटेशन बनवून देते.
- आपल्याला जर AI निर्मित स्लाईड आवडल्या नाही तर त्यासाठी काही टेम्प्लेट पण दिलेले आहेत, जे तुम्ही डायरेक्ट जोडू शकता.
- तुम्हाला जर AI द्वारे बनवलेल्या स्लाईड मध्ये काही बदल करायचे असतील त्यासाठी तसे पर्याय दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही हवे ते बदल करू शकता.
- Tome AI मध्ये तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा सोबत काम करणाऱ्या कोणालाही जोडू शकता. एकच प्रेझेंटेशन तुम्ही अनेकजण मिळून पूर्ण करू शकता. तसे फीचर यामधे दिलेले आहेत.
- आपले प्रेझेंटेशन बनवून झाल्यावर ते कॉम्प्युटर मध्ये किंवा मोबाईल मध्ये Save करून ठेवण्याची सोय करण्यात आलेली आहे. तुम्ही PPT, PDF कोणत्याही स्वरूपात फाईल डाऊनलोड करू शकता.
- Tome AI चे अजून एक महत्वाचे फीचर असे की आपण याला मोबाईल वरती सुद्धा सहजपणे वापरू शकतो, म्हणजे Tome AI मोबाईल फ्रेंडली आहे.
Tome AI कुठे वापरता येईल?
Tome AI हे Presentation बनवण्यासाठी एक उत्तम टूल आहे, म्हणजे याचा वापर अश्या सर्व ठिकाणी करता येईल जेथे Presentation बनवण्याची आवश्यकता असते. तर चला Tome AI चे उपयोग कुठे कुठे करता येतील हे पाहुयात.
- वस्तू किंवा सेवांचे मार्केटिंग करणारे व्यावसायिक प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी या टूलचा वापर करू शकतात.
- शाळा कॉलेज मध्ये शिक्षक आपल्या लेक्चरसाठी प्रेझेंटेशन तयार करतात तेथे या टूलचा वापर होऊ शकतो.
- विद्यार्थ्यांना या Tome AI द्वारे खूप फायदा होऊ शकतो कारण विद्यार्थ्यांना अनेक वेळेस प्रेझेंटेशनला सामोरे जावे लागते.
- Tome AI चा वापर ब्लॉग पोस्ट मध्येही करता येऊ शकतो. ब्लॉग पोस्टसाठी कंटेंट आणि इमेज बनवण्यासाठी हे टूल उपयुक्त ठरू शकते.
निष्कर्ष
Tome AI हे PPT तयार करण्यासाठी एक अद्भुत टूल आहे. हे तुमच्या वेळेची आणि मेहनतीची दोन्हीची बचत करते आणि तुम्हाला उच्च दर्जाचे PPT तयार करण्यास मदत करते. तुम्ही जर तुमच्या PPT साठी AI च्या मदतीचा लाभ घेऊ इच्छित असाल तर Tome AI हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. तर अशी होती आजची Tome AI वरील हि पोस्ट. मला आशा आहे कि आपल्याला हि पोस्ट नक्कीच आवडली असेल.
एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जर प्रेझेंटेशन बनवायला लावले असेल तर या टूल चा वापर करू नका कारण जर स्वतः बनवले तर तुम्हाला जास्त ज्ञान मिळेल आणि त्याची कौशल्ये तुमच्यात निर्माण होतील. Tome AI चा वापर करणे कायमच योग्य ठरते असे नाही त्यामुळे आपले नुकसान होऊ देऊ नका. आजची पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा.