माऊस हे Desktop Computer चे एक महत्त्वाचे असलेले इनपुट डिवाइस आहे. डग्लस एंगेलबार्ट यांनी माऊस चा शोध लावला, यांनी बनवलेला माऊस मेकॅनिकल प्रकारचा होता. आधीच्या काळात सर्व मेकॅनिकल माऊस वापरले जायचे.
पहिल्या माऊस च्या यशानंतर लोकांना माऊस मध्ये बदल करण्याची कल्पना आली. काही लोकांनी माऊस चा आकार बदलला तर काहींनी माऊस मध्ये वापरण्यात येणारे Tracking तंत्रज्ञान बदलले, यातूनच माऊस चे प्रकार निर्माण झाले.
सर्व यशस्वी Computer Mouse अनेक ठिकाणी वापरले जाऊ लागले. लोकांच्या गरजे नुसार व सोयी- सुविधे नुसार योग्य तो प्रकारचा माऊस वापरू लागले. आज या पोस्टमध्ये मी संगणक माऊस च्या काही महत्त्वाच्या प्रकारांची माहिती देणार आहे.
कॉम्पुटर माऊस चे 10 प्रकार व त्यांची माहिती
लोकांनी सोयी- सुविधे नुसार संगणक च्या माऊस मध्ये बदल केले व त्याला अनेक क्षेत्रात किंवा अनेक प्रकारच्या कामांसाठी सोयीस्कर बनवले. तर आज येथे आपण माऊस च्या महत्वाच्या प्रकारांची माहिती घेणार आहोत. चला सर्वात पहिले वायर च्या Computer Mouse Types पासून सुरुवात करूयात.
1) Wired Mouse
Wired Mouse म्हणजे असा माऊस जो संगणकाला Connect करण्यासाठी वायर चा वापर केला जातो. Wired Mouse हा माऊस चा सर्वसामान्य प्रकार आहे. जगातील सर्वात पहिला असलेला माऊस हा Wired Mouse होता. या प्रकारचे माऊस जुन्या काळातही उत्कृष्ट होते आणि आताही त्यांचा दर्जा कायम आहे.
Wired Mouse चा मोठा फायदा म्हणजे Data Transmission प्रक्रिया जलद गतीने होते. यामुळे या माऊस चा प्रतिक्रिया देण्याचा वेळ अतिशय जास्त आहे. Signal देण्याचे माध्यम वायर असल्याने या माऊस ची अचूकता उल्लेखनीय आहे. Wired Mouse संगणकाला USB Port द्वारे जोडलेला असतो.
2) Wireless Mouse
Wireless माऊस चा माऊस चा आणखीन एक प्रकार आहे. Wireless म्हणजे वायर नसलेला माऊस. यात Signal Transmission साठी केबल चा वापर होत नाही, तर यात Radio Signal द्वारे सिग्नल ची देवाण- घेवाण केली जाते.
Wireless माऊस मध्ये Bluetooth माऊस येतात. वायरलेस असल्यामुळे हे माऊस Wired पेक्षा हळू काम करतात. Signal देण्यासाठी कोणते ठोस माध्यम नसल्याने Wireless माऊस ची अचुकता Wired माऊस पेक्षा कमी आहे.
3) Mechanical Mouse
जगातील सर्वात पहिला माऊस Mechanical माऊस होता. या प्रकारातील माऊस मध्ये Position Detect करण्यासाठी रबर बॉल चा वापर केला होता. आपण माऊस सरकवला की खाल च्या बाजूला असलेला रबर बॉल फिरतो व त्याला असलेल्या Sensor च्या मदतीने Position संगणकाला वायर द्वारे सिग्नल च्या रुपात पाठवली जाते.
Mechanical माऊस ला बॉल माऊस असेही म्हणले जाते. यामध्ये संगणकाला Connect करण्यासाठी वायर वापरतात. माऊस मध्ये आलेल्या नवीन- नवीन बदलांमुळे मेकॅनिकल माऊस चा वापर आता कोणीही करत नाही. मेकॅनिकल माऊस चे उत्पादन आता बंद झालेले आहे.
4) Optical Mouse
सध्याच्या काळात Optical Mouse चा वापर सर्वात जास्त केला जातो. या प्रकारच्या माऊस मध्ये Movement Detect करण्यासाठी LED लाईट वापरली जाते. माऊस च्या खालच्या पृष्ठभागावर LED लावलेली असते. LED लाईट माऊस पॅड वरून परावर्तित होते व माऊस मध्ये लावलेल्या Sensor च्या मदतीने हे परावर्तन शोधले जाते.
आपण आतापर्यंत पाहिलेल्या माऊस पैकी हा सर्वात अचूक माऊस आहे. त्यानंतर हा माऊस संगणकाला केबल द्वारे किंवा Wireless Technology जसे Bluetooth द्वारे इनपुट पाठवतो व आपल्याला स्क्रीनवर आउटपुट दिसतो म्हणजेच कर्सर सरकतो. Optical Mouse ला आजच्या काळात खूप लोकप्रियता आहे, कारण याची किंमत सुद्धा कमी आहे.
5) Laser Mouse
लेजर माऊस हा सर्व वैशिट्यात Optical Mouse सारखाच असतो, फक्त फरक एवढाच आहे की लेजर माऊस मध्ये LED च्या जागी लेजर लाईट वापरली जाते. लेजर माऊस मध्ये वापरली जाणारी लाईट आपल्याला दिसत नाही कारण ही लाईट Visible Spectrum च्या बाहेरील Frequency ची असते.
लेजर माऊस ची अचूकता तर Optical माऊस पेक्षा चांगली आहे. आपण TV चा रिमोट पाहिला असेल, त्यात समोरून एक बल्ब बसवलेला असतो, पण तो कधी प्रकाशमान होत नाही. याप्रमाणेच लेजर माऊस चे तंत्रज्ञान असते. या माऊस ची नकारात्मक बाजू म्हणजे याची किंमत. किमतीमुळे हा Optical माऊस ला मागे टाकू शकला नाही.
6) Trackball Mouse
Trackball Mouse ची रचना इतर पेक्षा वेगळी आहे. बाकीच्या सर्व माऊस ला चालवण्यासाठी माऊस ला पॅड वर सरकवा लागतो, पण Trackball माऊस ला असे सरकवण्याची गरज नसते. या माऊस ला वरील बाजूला एक बॉल असतो, तो बॉल गोल फिरवला की Computer स्क्रीन वरील कर्सर फिरतो.
आपल्याला जर माऊस चा जास्त वापर करायचे काम असेल तर Trackball Mouse उपयोगी ठरू शकतो. बॉल ला Sensor लावले असल्याने ते Position Track करते. या माऊस ने कार्ये पटकन करता येतात व कर्सर ची हालचाल वेगाने करता येते.
7) Stylus Mouse
Stylus Mouse तर बाकी कोणत्याच माऊस सोबत जुळत नाही आणि याचा वापरही जास्त केला जात नाही. हा माऊस दिसायला पूर्णपणे पेन सारखा असतो आणि हा चालवला पण पेन सारखाच जातो. आपण जसे पेन च्या मदतीने वहिवर लिहतो अगदी त्याचप्रमाणे आपण माऊस पेडवर लिहायचे. लगेच आपल्याला आपल्याच अक्षरात कंप्यूटर वर लिहलेले दिसेल.
Stylus माऊस खासकरून डिजीटल डिजायनर्स साठी बनवण्यात आला आहे, त्यामुळे हा मध्ये खूप महाग असतो. Stylus माऊस मध्ये आता Pressure Sensitive वैशिष्ट्य जोडण्यात आलेले आहे. वहिवर लिहताना आपण रगडून लिहले की अक्षर जाड येते अगदी त्याच पद्धतीने Stylus मध्ये Pressure Sensitive Feature कार्य करते.
8) Gaming Mouse
खास PC Gamers साठी हा माऊस डिजाईन करण्यात आला आहे. Gaming माऊस आपल्याला Wired आणि Wireless या दोन्हीही प्रकारचा बाजारात मिळेल. Gaming Mouse बाकी माऊस प्रमाणेच असतो, पण यात Gaming साठी काही अतिरिक्त वैशिष्ट्य देण्यात आली आहेत.
Gaming माऊस ची Position Detection ची अचूकता खूप जास्त असते व बटन्स चा Response Time खूप कमी असतो. PC Gamers ला हातांचा त्रास होऊ नये यासाठी Gaming Mouse ची डिजाईन Ergonomic बनवण्यात आली आहे.
9) Presentation Mouse
Presentation म्हणजे सादरीकरण. Presentation माऊस हा खास कॉम्पुटर सादरीकरण करण्यासाठी आहे. शाळा, कॉलेज आणि ऑफिस मध्ये PPT Presentation करताना Slide बदलाव्या लागतात त्यासाठी कोणाला तरी Computer शेजारी बसवावे लागते, पण या माऊस ने ही समस्या सोडवली आहे.
Presentation Mouse हा Wireless असतो व त्याला कोठेही सरकवण्याची सुद्धा गरज नाही. यात लेजर सुद्धा देण्यात आलेले आहे. लेजर च्या मदतीने Point करायला मदत होते. Slide Change करण्यासाठी यात बटण असतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हे माऊस TV रिमोट सारखाच आहे.
10) Vertical Mouse
आरोग्यासाठी सर्वात फायद्याचा ठरणारा हा माऊस आहे. Vertical Mouse ची डिजाईन आपल्या हाताचा त्रास कमी करण्याच्या हेतूने बनवलेली आहे. माऊस च्या अतिवापरामुळे हातांना व खांद्याना Carpal Tunnel Syndrome हा घातक आजार होऊ शकतो.
त्यामुळे जर आपल्या कामात माऊस चा वापर जास्त असेल तर Vertical Mouse वापरायला हवा. हा माऊस वापरल्याने हाताच्या मनगट वरील व खांद्या वरील दाब कमी होतो त्यामुळे Carpal Tunnel Syndrome सारख्या आजारापासून आपली सुरक्षा होते.
निष्कर्ष-
आपण माऊस चा वापर किती करतो व कोंतून कामासाठी करतो, यानुसार माऊस वापरायला हवा. सामान्य वापरासाठी जसे घरगुती व शैक्षणिक वापरासाठी तर Optical किंवा Wireless माऊस वापरलेला चांगलं पडेल.
तर चला आता आपल्याला माऊस चे प्रकार व त्यांची माहिती मी दिली आहे. मला आशा आहे की माऊस चे प्रकार किती व कोणते आहेत हे नक्की समजले असेल. आपल्याला जर हा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.
माऊस चे प्रकार, लेख संबंधित काही शंका असेल तर खाली कंमेंट करून नक्की विचारा व लेख कसा वाटला हे पण सांगा.